🌎परभणीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.......!


🌟कार्यक्रमाचे खास आकर्षण बचत गटातील महिलांचे विविध प्रकारचे व्यवसायिक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते🌟

परभणी (दि.११ मार्च) - परभणी येथे 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व डिजिटल सर्वांसाठी या थीम ला अनुसरून रिलायन्स फाऊंडेशन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे जागतिक महिला दीन साजरा करण्यात आला. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.रश्मी खांडेकर होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.दीपक दहे,कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम प्रमुख डॉ.प्रशांत भोसले,MGB बँकेचे विभागीय प्रमुख श्री.G.S देशमुख,LBM श्री.सुनील हत्तेकर,कॅनरा बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. राघवेंद्र,RSETI च्या मनीषा शिर्शीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे खास आकर्षण राहिलेल्या बचत गटातील महिलांचे विविध प्रकारचे व्यवसायिक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते.प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्टॉल चे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम जसे गीत गायन,बंजारा नृत्य,महिला यशोगाथा सादर करण्यात आल्या.उत्कृष्ट महिला बचत गट व्यवसायिक,तसेच महिला उद्योजिका यांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या ठिकाणी 49 महिला बचत गटांचे व्यवसायिक स्टॉल लावण्यात आले होते. त्यात मसाला,हळदी पावडर,कापड,भाजीपाला, भरडधान्य,शोभेच्या वस्तू,ज्वेलरी,चिक्की,खवा,गाईचेतूप,लेडीज पर्स,मध, भगर पीठ,शेवाई,पापडी आदींचा समावेश होता.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. रश्मी खांडेकर मॅडम यांनी व्यवसायिक महिला उ्योजिकाचे कौतुक करत महिलांनी आपला जास्तीत जास्त वेळ व्यवसायात देऊन आपला आर्थिक विकास करून घ्यावा असे आवाहन यावेळी केले. तसेच महिलांनी व्यवसायात गुणवत्ता वाढीवर भर देण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. महिलांची सामाजिक,आर्थिक व राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.तसेच विज्ञान व तंत्रज्ञान युगात आपण  स्त्री - पुरुष भेदभाव न करता स्त्री - पुरुष  समानता राखण्याचे आवाहन केले. रिलायन्स फाउंडेशन करत असलेल्या कामाचे कौतुक यावेळी बोलताना त्यांनी केले.

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेद चे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.दीपक दहे यांनी केले तर रिलायन्स फाऊंडेशन चे DPO श्री.रावसाहेब परमार यांनी रील्यान्स फाऊंडेशन च्या कामाची व्याप्ती, उद्देश व डिजिटल साक्षरता याबद्दल मार्गदर्शन केले.रिलायन्स फाऊंडेशन च्य्या जिल्हा प्रमुख श्रीमती.रुपा भादक्कर यांनी महिलांना व्यवसाय संधी,गुणवत्ता, डिजिटल मार्केटिंग,डिजिटल पेमेंट व्यवस्था या विषयी मार्गदर्शन केले.

कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रशांत भोसले यांनी महिलांना भरडधान्य,उत्पादन,प्रक्रिया व विक्री व्यवस्थपन या विषयी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमात 60 महिला बचत गटांना SBI, कॅनरा बँक व MGB बँक यांच्या मार्फत 1 कोटी 20 लक्ष बँक कर्ज मंजुरी देण्यात आली.यासाठी बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते व त्यांनीही महिलांना बँक लिंकेजेस, वित्तपुरवा,विमा पॉलिसी,डिजिटल बँकिंग या विषयावर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिलायन्स फाऊंडेशन चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.अमोल खंडागळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय डांगे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी RF चे श्री.अमन परमार, उमेद चे परभणी चे BMM श्री.संदीप भालेराव,DM-IBCB पारदे सर, गंगाखेड चे BMM श्री. अच्युत रेडे,तसेच रिलायन्स फाऊंडेशन च्या टीम ने परिश्रम घेतले.कार्यक्रमात 79 गावातील,238 महिला बचत गटातील 972 महिलांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या