🌟परभणी ते पुसद,बीड,आणि चिखली या नवीन रेल्वे मार्गांचे प्रस्ताव पाठवावे.....!


🌟मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी🌟 

परभणी / दि.15 मार्च

परभणी-पुसद,परभणी-बीड आणि परभणी-चिखली दरम्यान नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत भारत सरकार आणि भारतीय रेल्वे विभागाकडे नोंदणी तसेच सर्वेक्षण करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची विनंती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. आज जिल्हाधिकारी परभणी यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की दक्षिण-मध्य विभागातील अधिकार्यांनी तेलंगणा आणि आंध्रात प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावागावांत नवीन रेल्वे मार्ग निर्माण करताना मराठवाडा विभागाकडे सतत दुर्लक्ष करीत आहे. दक्षिण-मध्य रेल्वे विभागातील अधिकारी केवळ आंध्र आणि तेलंगणात अनेक नवीन रेल्वे मार्ग निर्माण करीत आहेत. त्याच वेळी प्रांतीय भेदभावाने मराठवाडा विभागाकडे सतत दुर्लक्ष करीत आहेत. मागासलेल्या परभणी, बीड, हिंगोली आणि पुसद जिल्ह्यांचा सर्वांगीण विकासासाठी परभणी-पुसद, परभणी-बीड आणि परभणी-चिखली दरम्यान तीन नवीन रेल्वे मार्ग निर्माण केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सबका साथ सबका विकास" हा नारा मराठवाडा करिता खर्या अर्थाने सार्थक ठरणार आहे.

"परभणी-पुसद" नवीन रेल्वे मार्गाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र रेल्वे मार्गाने जुडणार. नियोजित परभणी-पुसद रेल्वे मार्गाला पुसद पुढे निर्माणाधीन  नांदेड-वर्धा मार्गे नागपूरला केवळ ७ ते ८ तासात पोहचणे शक्य असल्याने "परभणी-पुसद" नवीन मार्ग अत्यंत  महत्वपूर्ण आहे.  "परभणी-बीड" नवीन रेल्वे मार्गाने नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम सहीत संपूर्ण मराठवाडा विभागातून नगर मार्गे पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा, शिर्डी सहीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र जवळून जुडणार आहे. परभणी ते मानवत, पाथरी, माजलगांव, पाथ्रुड,  वडवणी जोडल्यास वडवणी च्या पुढे नियोजित परळी-बीड-नगर मार्ग निर्माणाधीन आहे. नगर येथून नगर-माळशेज (कल्याण जवळ) मार्गे मुंबई ला जवळून गाठणे शक्य होणार आहे.  परभणी-चिखली (बुलढाणा) नवीन रेल्वे मार्गाने जिंतूर येथील प्रसिद्ध नेमगिरी जैन मंदिर, येलदरी डॅम, रिसोड, मेहकर इत्यादी प्रमुख  स्थळ रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे. परभणी ते  झरी, बोरी, जिंतूर, नेमगिरी जैन मंदिर, येलदरी, रिसोड,  मेहकर, मार्गे चिखली पर्यंत रेल्वे मार्ग निर्माण करावी. चिखली चे पुढे बुलडाणा पर्यंत नवीन रेल्वे मार्ग निर्माणाधीन आहे. या नवीन रेल्वे मार्गाने मराठवाडा मार्गे दक्षिण ते उत्तर भारताला सर्वात जवळून जोडणारा एक प्रमुख रेल्वे मार्ग निर्माण होईल. या तीनही नवीन मार्गांचे महत्व ओळखून भारत सरकार आणि भारतीय रेल्वे विभागाने मंजुरी देऊन सर्वेक्षण करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचावतीने डाॅ विवेक नावंदर, अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन,बाळासाहेब देशमुख, डा. राजगोपाल कालानी,खदीर लाला हाशमी,दयानंद दीक्षित, दिलीप बोरूळकर,श्रीकांत अंबोरे इत्यादी ने केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या