🌟गंगाखेड बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार....!


🔹भगवान सानप यांच्या पाठींब्यामुळे बळ वाढले 🔹

गंगाखेड : कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार नुकत्याच संपन्न झालेल्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. या संदर्भाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सहकारी संस्था मतदार संघात प्राबल्य असलेले अपक्ष जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप यांनी ऊपस्थिती लावून महाविकास आघाडीस पाठिंबा दिला. यामुळे गंगाखेड बाजार समिती निवडणूकीत महाविकास आघाडीचे प्राबल्य वाढल्याचे चित्र प्रारंभीच नीर्माण झाले आहे. 

गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी सभापती बाळकाका चौधरी हे होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते साहेबराव भोसले, अपक्ष जि. प. सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक भगवान सानप, अमित घनदाट, कॉंग्रेस जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, तालुकाध्यक्ष गोविंद यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सातपुते आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. 

मागील मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. विशाल कदम, साहेबराव भोसले, भगवान सानप, प्रकाशराव शिंदे आदिंनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात बाळकाका चौधरी यांनी शक्य ते सर्व प्रयत्न करून ही निवडणूक जिंकण्याचा संदेश दिला.  कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर, खा. संजय जाधव, माजी आ. सीताराम घनदाट, डॉ. मधुसूदन केंद्रे या सर्वांच्या प्रयत्नातून ही निवडणूक जिंकणे सहज शक्य असल्याचा आत्मविश्वास यावेळी चौधरी यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक ॲड संतोष मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन गोविंद यादव यांनी केले. 

बैठकीस प्रताप कदम, माधवराव ठावरे, अभय कुंडगीर, श्रीकांत भोसले, ॲड हनुमंत जाधव, शेख युनूस, नारायणराव शिंदे, लिंबाजी देवकते, धोंडीराम जाधव, प्रकाशराव शिंदे, ऊद्धव सातपुते, ऊमाकांत कोल्हे, सिद्धार्थ भालेराव, शिवाजीराव निरस, डिगंबर घोगरे, गंगाधर पवार, ज्ञानोबा व्हावळे, जामकीराम पवार, जितेश गोरे, कुलदीप जाधव आदिंसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते ऊपस्थित होते. 

* सहज जिंकू - भगवान सानप

महाविकास आघाडीच्या वरीष्ठ आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांनी एकजूट ठेवली तर ही निवडणूक सहज जिंकू, असा आत्मविश्वास या प्रसंगी बोलताना भगवान सानप यांनी व्यक्त केला. कोणी स्वतःला कितीही मोठा नेता म्हणवून घेत असले तरी जनमताच्या बळावर मागील नीवडणूकांत आपण त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे भविष्यातील संघर्षासाठीही आपण सज्ज असून बाजार समिती निवडणूकीत जनमताच्या बळावर पुन्हा हेच सिद्ध करू, असा निर्धार सानप यांनी व्यक्त केला. सानप हे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अपक्ष संचालक असून सेवा सहकारी सोसायटी मतदार संघात त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या