🌟जिंतूर बस आगारात असुविधा मुळे प्रवाश्यांचे हाल सुलभ स्वच्छता गृहाचे दर अवाजवी....!


🌟महाराष्ट्र राज्य प्रवासी संघटना व अखील ग्राहक पंचायतच्या वतीने निवेदन🌟 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर 

जिंतूर (दि.२५ मार्च) - येथील बस आगार मध्ये प्रवासी नागरिकांना अनेक असुविधांचा  सामना करावा लागत आहे .प्रवासी संघटना व अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीने विभागीय नियंत्रण परभणी  यांना दिनांक 23 मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे.

 तालुक्यातील  170 गावांचा कारभार जिंतूर आगारा मार्फत नागरिकांच्या सुविधासाठी बसचा उपयोग केला जातो. परंतु अनेक दिवसांपासून जिंतूर आगारातील नागरिकांना मूलभूत सुविधा पासून वंचित रहावे लागत आहे. प्रवासी संघटने कडे अनेक प्रवाशांनी  तोंडी स्वरूपात तक्रारी देण्यात आल्या .त्या तक्रारीची दखल घेऊन प्रवासी संघटना व  अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने बस  स्थानकामध्ये मध्ये प्रवाशांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी, बस प्लॅटफॉर्मवर लावावी, दर्शनी भागावर गावाच्या नावाचे बोर्ड  बस मध्ये लावावा, प्रवाशांना बसताना व उतरताना वाहकाने सहकार्य करावे . महिला व ज्येष्ठ नागरिकांशी सौजन्याने वागावे. अनेक वाहक प्रवाशांची आरेरावची भाषा करीत आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. बस  दुरुस्ती असल्या शिवायत पुढील प्रवासाला पाठवू नये. अनेक वेळा बस नादुरूस्त असल्यामुळे प्रवाशांना मधेच प्रवास सोडून दुसऱ्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. डिझेलच्या अडचणीमुळे अनेक बस बंद केले आहेत. त्या पुर्ववत चालू कराव्यात. जिंतूर बस स्थानकातील सुलभ स्वच्छालय गृहामध्ये महिला व नागरिकांची जास्त पैसे घेऊन लूट केली जात आहे. ती लूट थांबवावी अशा मागण्या प्रावासी संघटनेच्या व अखिल भारतीय ग्राहक पंचायत वतीने आगार  प्रमुख एम.बी. जवळेकर,डि डी पांचाळ, जिंतूर, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याकडे करण्यात आले आहेत .या निवेदनावर प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन रायपत्रीवार, संघटक किशोर पारडे,  व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे ,सचिव मंचकराव देशमुख मार्गदर्शक चंद्रकांत गवळी उपाध्यक्ष महेश देशमुख, प्रल्हाद टाकरस अनेक सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या