🌟राज्याचा 2023-24 सालचा अर्थसंकल्प सादर : 3 हजार 069 अंगणवाडी सेविकांना मिळणार वाढीव मानधनाचा लाभ....!


🌟अंगणवाडी सेविकांना 8 हजार 325 रुपये यापूर्वी मानधन होते ते आता अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे 10 हजार रुपये झाले🌟 

परभणी (दि.28 मार्च) : राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा 2023-24 सालचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्यात आली.  परभणी जिल्ह्यातील एकूण तीन हजारावर अधिक अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना या वाढीव मानधनाचा लाभ होणार आहे.

अंगणवाडी सेविकांना 8 हजार 325 रुपये यापूर्वी मानधन होते. ते आता अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे 10 हजार रुपये झाले आहे. मिनी अंगणवाडी सेविकांना 5 हजार 975 रुपयावरुन 7 हजार 200 रुपये, मदतनीसांना 4 हजार 425 वरुन 5 हजार 500 रुपये मानधन झाले आहे. तसेच अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20 हजार पदे भरण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 219 रिक्त पदे भरण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. 

भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ “अंगणामधील निवारा” असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने 1975 साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता. आईसीडीएसअंतर्गत अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे.

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता, किशोरवयीन 11 ते 18 वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी, गरोदर महिलांचे धनुर्वातविरोधी लसीकरण, संदर्भ सेवा, पूरक पोषण आहार, पोषण आणि आरोग्य शिक्षण दिले जाते. तसेच 15 ते 45 वयोगटातील अन्य महिलांना पोषण आणि आरोग्याचे शिक्षण दिले जाते. एक वर्षाखालील व एक ते तीन वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा आदी सेवा पुरविल्या जातात. तर तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण आदी सेवा पुरविल्या जातात. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस महत्त्वपूर्ण असा सामाजिक दुवा म्हणून काम करतात.

परभणी जिल्ह्यात परभणी प्रकल्पांतर्गत 286,सेलू 150,जिंतूर 298,गंगाखेड, 196,पुर्णा 183,पालम 150,पाथरी 118,मानवत 100 आणि सोनपेठ 95 असे एकूण 1 हजार 576 अंगणवाडी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या