💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट /हेडलाईन्स/ बातम्या.....!


💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर,आज राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक💥

 ✍️ मोहन चौकेकर

* पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी आघाडीसाठी उद्धव ठाकरेंची तयारी सुरु पवार नितीश कुमार ममता बॅनर्जी केजरीवाल यांच्याशी फोनवरुन चर्चा मार्च महिन्यात भव्य सभेचं आयोजन 

* शिवसेना भवन, शिवाई ट्रस्टविरोधात तक्रार पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला जागा कशी दिली? सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांची धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार 

* उद्धव ठाकरेंच्या १५ आमदारांवर अपात्रकेची टांगती तलवार, एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्व ५६ आमदारांना व्हिप बजावणार, व्हिप न पाळल्यास कारवाईचा शिंदे गटांच्या गोगावलेंचा इशारा 

* २०२४ची निवडणूक लोकशाहीसाठी शेवटची ठरु शकते, भाजपाचा सामना आत्ताच केला नाही तर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होईल जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

* शिवसेना आणि धनुष्यबाण संदर्भातील निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडुन विधीमंडळाच्या कार्यालयाचा ताबा, विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर  एकनाथ शिंदें गटाचे आमदार कार्यालयात मंत्रालयासमोरील शिवायल कार्यालयाचाही ताबा घेणार 

* मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाच्या शिवसेनेच्या हालचाली, बीएमसी बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

* तुरुंगात असलेल्या पतीकडून राखी सावंतला धमकी ; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

* आता आता फेसबुक व इंस्टाग्राम होणार Paid; सोबत मिळणार ब्लू टीक आणि इतर सुविधा देखील 

* दिल्लीहून देवघरला जाणारे इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; लखनऊमध्ये करण्यात आलं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर,आज राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक

* मुंबई मनपातील शिवसेना कार्यालयही शिंदे गट ताब्यात घेण्याची शक्यता

* BVR सुब्रमण्यम असणार निती आयोगाचे नवे सीईओ

* मुंबईच्या रस्त्यांवर 21 फेब्रुवारी पासून धावणार पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस

* राज्यात उद्यापासून 12वी ची परीक्षा सुरु होणार; कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर जमावबंदीचे 144 कलम लागू, केंद्राजवळचे झेरॉक्सची दुकानेही बंद ठेवली जाणार

* निवडणूक आयोग बरखास्त करा: उद्धव ठाकरे यांची मागणी, आयुक्तांची निवड निवडणूक घेऊन करण्याचे आवाहन

* भारताचे 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत तुर्कीत 99 सदस्यांच्या या टीममार्फत 4 हजार रुग्णांवर उपचार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहीती

* धनुष्यबाणाच्या निकालानंतर पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका; 'सुनावणीसाठी उद्या या' तातडीनं सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

* मुंबईत वायू प्रदूषणामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 14 हजार नागरिकांचा मृत्यू, 'ग्रीनपीस' संस्थेच्या अहवालातून माहीती आली समोर

* पठाण चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार; रिपोर्टनुसार, येत्या 25 एप्रिलपासून हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार

* एकनाथ शिंदेंची शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर, उद्या पहिल्यांदा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार 

* फेसबुकच्या ब्लू टीकसाठी मोजावे लागणार पैसे, 11.99 डॉलर्स द्यावे लागणार; ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सुरू होणार सेवा

* महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी हल्ला, छत्तीसगडमधील 2 पोलीस शहीद झाल्याची भीती व्यक्त तर एक पोलिस जखमी 

* T-20 Worldcup: भारताचे आयर्लंडला 156 धावांचे आव्हान ; भारताच्या 6 बाद 155 धावा, स्मृती मंधानाच्या 87 धावा

* सोन्याच्या दरात आजही घसरण, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅम 56830 रुपयांना तर 22 कॅरेट सोन्याचे दर 52100 रुपये प्रति 10 ग्रॅम

* ब्राझीलमधील पाउलोच्या किनारी भागात भूस्खलनाच्या घटना; 36 जणांचा मृत्यू, शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

* राजस्थानमधील मूमल मेहर या लेडी सूर्यकुमारला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मदत, मुख्यमंत्री निधीतून ट्रेनिंगसाठी सर्व मदत करण्याचा निर्णय जाहीर

* पुढील 48 तासात कोकणात व राज्यात अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता, सकाळी 11 ते 2 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा - हवामान विभाग

* बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षातून उपेंद्र कुशवाह पडले बाहेर, 'लोक समता जनता दल' या नव्या पक्षाची केली घोषणा

* शेअर मार्केटमध्ये घसरण: सेन्सेक्स 311 अंकांच्या घसरणीसह 60,691.54 वर बंद, निफ्टी 99.60 अंकांच्या घसरणीसह 17,844.60 वर 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या