💥पुर्णा नगर परिषदेतील बोगस कारभार : गाळ्यांची परस्पर विक्रीसह बोगस पावत्यांच्या आधारे भाडे वसूली...!


💥मुख्याधिकारी अजय नरळे घेत आहेत झोपेचे सोंग ? मुख्याधिकारी/प्रशासकांची वचक नसल्यामुळे न.प.प्रशासन बेलगाम ?💥

💥नगर परिषद मालकीच्या व्यवसायिक गाळ्यांच्या भाड्याची बोगस पावत्यांच्या आधारे वसूली : भाडे भरूनही गाळे धारकांना नोटीस💥


पूर्णा (दि.१४ फेब्रुवारी) - पुर्णा नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर मागील २९ डिसेंबर २०२१ रोजी संपल्यानंतर नगर परिषद प्रशासनाचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला व प्रशासक म्हणून म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला प्रशासक नियुक्तीला आज पावेतो जवळपास १४ महिण्यांचा कालावधी उलटत असतांना नगर परिषदेचे कारभार सुधारेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात होती परंतु नगर प्रशासनावर प्रशासक पाटील यांच्यासह मुख्याधिकारी अजय नरळे यांचा देखील कुठलाच अंकूश नसल्यामुळे नगर परिषद प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी बेलगाम झाल्याचे निदर्शनास येत असून कुंपनानेच शेत गिळावे अशी परिस्थिती पुर्णा नगर परिषदेची झाली आहे.


पुर्णा शहरात नगर परिषदेच्या मालकीची शहरात शेकडाभर दुकाने असून शहरात तिन महत्वाची शॉपींग सेंटर आहेत ज्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर,शहिद स्व.राजाभाऊ बरदाळे शॉपींग सेंटर,छत्रपती संभाजी महाराज शॉपींग सेंटरसह जुना मोंढा परिसरात देखील गोंधळ सम्राट कै.राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहालगत शॉपींग सेटर मध्ये व्यवसाईक गाळे अर्थात दुकान बांधण्यात आलेली आहेत शहरात नगर परिषदेच्या मालकीची जवळपास शंभराच्यावर दुकान असून सदरील दुकान ज्या लोकांना छत्तीस महिण्यांच्या भाडे करारावर (लिजवर) देण्यात आलेली होती त्या मुळ लिजधारकांनी करार संपल्यानंतर सदरील दुकान नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना हातीशी धरून नियमबाह्य पध्दतीने नगर परिषद प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करीत परस्पर लाखो रुपयांना विक्री केल्याचा गंभीर प्रकार मागील दहा वर्षापुर्वीच उघडकीस आला होता या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तत्कालीन तहसिलदार सुरेखा नांदे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले होते.

तत्कालीन तहसिलदार नांदे यांनी चौकशी अहवालात तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यासह तब्बल बारा नगरसेवक दोषी असल्याचे अहवालात नमूद केले होते परंतु सदरील अहवाल दाबण्यात आल्याचे उघड झाले याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे आतातर नगर परिषदेतील वसुली विभागातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या बोगस पावती बुक छापून त्या बोगस पावत्यांच्या आधारे नगर परिषद शॉपींग कॉम्प्लेक्स मधीन गाळे धारकांकडून चक्क भाडेवसूली करुन परस्पर गिळकृत केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे शहतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर  मधील वर्षीक थकीत भाडे भरणाऱ्या दुकानदारास बोगस पावत्या देऊन वसूली केल्याचे  गौडबंगाल काय ? या बाबत  दुकानंदारंन मध्ये संभ्रम निर्माण होऊन व्यापाऱ्यांत उलट सुलट चर्चेस उधाण आले आहे त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून दोषी कारवाई करण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे

पूर्णा नगर पालिका दर वेळेस काही ना काही कारणाने चर्चेत राहिला आहे नुकतेच बोगस कर्मचारी भरती,शासकीय जागेचे बोगस नांमातर प्रमाणे आता वसुलीची बनावट बिल बुक छापून बोगस पावत्याचा कारभार समोर आला आहे काही नपाच्या कर्मचाऱ्यानी शहरातील बाजारपेठ मधिल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर मधील काही दुकानदाराचे थकीत वार्षीक भाडे भरणा करून ही थकीत भाडे भरण्याची नोटीस काढल्याने भरणा केलेल्या दुकानदारा मध्ये गोधळ उडाला आहे त्यामुळे भरणा केलेल्या काही दुकानदाराने नपा कार्यलयातुन आलेल्या वसुली कर्मचाऱ्या कडे थकीत भाडे भरल्याची पावती कर निरक्षकास दाखवली त्यामुळे सदर पावती बोगस असल्याचे निर्देशनास आले या वरून काही वसुली कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यलयाची बनावट वसुली बुक छापून वसुली करून लाखो रूपायचा घोटाळा केल्याची बाब समोर आली असताना ही नगर परिषदेचे मुख्याधिकारी नरळे व प्रशासक पाटीलया बोगस भाडे पावती घोटाळ्या बाबत कठोर कार्यवाही करतात की पुन्हा या प्रकरणावर पडदा टाकून भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाचवतात याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले असून या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या