🌟परभणी जिल्ह्यात सैन्य भरती सामाईक प्रवेश परिक्षाकरीता अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟जिल्ह्यातील सर्व पात्र ऊमेदवारानी  www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावे🌟

परभणी (दि. 27 फेब्रुवारी) : सैन्य भरती कार्यालय औरंगाबाद यांच्याद्वारे सैन्य भरती 2023 सामाईक प्रवेश परीक्षा (सीईई) साठी  पात्र इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन सैन्य भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे. या सैन्य भरती सामाईक प्रवेश परिक्षाकरीता www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि.  16 फेब्रुवारी, 2023 ते दि. 15 मार्च, 2023 पर्यंत पात्र उमेदवारांना आपले अर्ज सादर करता येणार आहे. ही सामाईक प्रवेश परीक्षा दि. 17 एप्रिल, 2023  ते दि. 04 मे, 2023 औरंगाबाद, जळगांव व नांदेड या तीन केंद्रावर घेण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व पात्र ऊमेदवारानी  www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.....


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या