🌟स्थानिक स्वराज्य संस्था जन्मापासून मृत्यूपर्यंत लोकांना सेवा देतात - अजय नरळे


🌟पुर्णा नगर परिषदेस क्षेत्रीय भेट देण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्याधिकारी नरळे यांनी केले प्रतिपादन 🌟


पुर्णा - (दि.२३ फेब्रुवारी) प्रतिनिधी - स्थानिक स्वराज्य संस्था जन्मापासून मृत्यूपर्यंत लोकांना सेवा देणाऱ्या महत्वपूर्ण संस्था असतात असे प्रतिपादन मुख्याधिकारी अजय नरळे यांनी केले. ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय व श्री. गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एमओयु अंतर्गत नगरपरिषद पूर्णा येथे क्षेत्रिय भेट दिली असता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नगर परिषदेचे अधिकारी अजय नरळे बोलत होते. 

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसहभागातून विकासाच्या अनेक योजना आहेत त्यासंदर्भाने लोकसहभाग वाढवला तर शहराचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो यासाठी जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करावी लागते असेही त्यांनी यावेळी सांगितले. यानिमित्ताने शहरात विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती या निमित्ताने विद्यार्थ्यांना शहरातील विकास कामे दाखवितांना रस्ते, पथदिवे, महापुरुषांचे पुतळे यांचे सुशोभीकरण व बाजारपेठेतील दुकाने यांचे निरीक्षण करून माहिती संकलित करण्यात आली. नगरपरिषदेतील विविध विभागांना भेटी दिल्याअसता विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कामासंबंधीची माहिती उत्तम कांबळे आणि नगरपरिषदेचे अधिक्षक बाबर यांनी दिली. या रॅलीचे नेतृत्व  प्रोफेसर डॉ.पांडुरंग भुताळे, डॉ. संतोष कुर्‍हे, डॉ. पी. डी. सूर्यवंशी. प्रा. अतुल शिंदे, डॉ. कोंडबा हटकर, प्रा.डॉ.पी.के. किर्तनकार, प्रा. सोमनाथ गुंजकर, प्रा.डॉ.  विनोद कदम,डॉ. रेखा पाटील, प्रा. जगन्नाथ कदम आदी प्राध्यापकांनी  केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या