🌟महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्काराचे प्रस्ताव आमंत्रित.....!


🌟अक्षय तृतीयेच्या दिवशी एक व्यक्ती व एका संस्थेला 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार' प्रदान करण्यात येतो🌟

परभणी (दि.23 फेब्रुवारी) :  वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्यरत कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि समाजसेवक तसेच या समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी वैशाख शुद्ध, अक्षय तृतीयेच्या दिवशी एक व्यक्ती व एका संस्थेला 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार' प्रदान करण्यात येतो.

राज्य शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्काराचे प्रस्ताव ४ मार्चपर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.  या पुरस्कारासाठी पुरुष ५० आणि महिलेचे वय ४० वर्षापेक्षा जास्त असावे. तरी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन जायकवाडी वसाहत कारेगाव रोड परभणी यांच्याकडे कालमर्यादेत विहित नमुन्यात चार प्रतीत सादर करावेत, असेही श्रीमती गुठ्ठे यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या