🌟मराठी भाषेचा उत्कर्ष सातत्याने होत राहील - डॉ संतोष हंकारे


🌟मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते🌟


पुर्णा (दि.२७ फेब्रुवारी) - श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यापक पातळीवर मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात येतो त्यानिमित्ताने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भिंती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमात महाविद्यालयात मराठी विभागाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संतोष हंकारे यांनी मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा उत्कर्ष सातत्याने होत असून, मराठी भाषेचे कौशल्य प्राप्त केल्यास मराठी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ के. राजकुमार उपस्थित होते यावेळी ते बोलताना मराठी भाषेतील बलस्थाने हेच भाषेला चिरंतन ठेवण्यास समर्थ असल्याचे स्पष्ट केली तसेच उपप्राचार्य डॉ संजय दळवी उपप्राचार्य प्रा शेख फातिमा यांनी मराठी भाषे विषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड कशी निर्माण होईल याविषयी विवेचन केले या कार्यक्रमास  महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असलेले डॉ शेख राजू यांनी ज्ञानभाषा आणि मराठी याविषयी मांडणी केली या कार्यक्रमास डॉ शिवसांब कापसे ,डॉ गजानन कुरुंदकर डॉ गंगाधर कापुरे डॉ सोमनाथ गुंजकर डॉ चिंचोले सर डॉ अंबिका चोंडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजीव यशवंते त्यांनी केले तर आभार विद्यार्थी मोतीराम शिंदे यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या