💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील वारकरी बापुराव धोंडजी ढोणे- पाटील यांचे निधन...!


💥वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांचा स्वर्गवास झाला त्यांना ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराज यांची माळ होती💥

पुर्णा (दि.०६ फेब्रुवारी) - तालुक्यातील पांगरा ढोणे येथील जेष्ठ नागरिक तथा वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत श्रीक्षेत्र पंढरपूरचे वारकरी श्री बापुराव धोंडजी ढोणे पाटील पांगरेकर यांचे आज रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी राञी ११ वाजता वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांचा स्वर्गवास झाला. त्यांना ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराज यांची माळ होती व श्री संत मारोतराव महाराज दस्तापुरकर सोपान काका ईसादकर महाराज यांच्या सानिध्यात राहून त्यांनी १९६६ पासून पंढरपूर ,आळंदी, देहू  ,येथील नित्यनेमाने पायी वारी केली.ते नेहमी हरीभक्त पारायण,धार्मिक, सांप्रदायिक हरिनाम जागरात राहयचे.

प्रत्येक एकादशी वृतास पंढरपूर वारी करीत. श्री विठ्ठल- रुक्मिणी   ईश्वराचे निस्सीम भक्त होते.शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे ओठी श्री राम...पांडुरंगा हेच हरिनाम उमटत होते. त्यांच्या पश्चात मुलगा-संभाजी बापूराव ढोणे,सदाशिव बापूराव ढोणे,सुदाम बापूराव ढोणे,नातू निवृत्ती धोंडीराम ढोणे, तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या प्रार्थिव देहावर सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पांगरा ढोणे येथील मोक्षधाम स्मशानभूमीत सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बापुराव धोंडजी ढोणे हे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सदाशिव ढोणे पाटील, सांप्रदायिक विठ्ठल धोंडीराम ढोणे,भागवत संभाजी ढोणे,मुरली सुदामा ढोणे यांचे  आजोबा होत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या