💥पुर्णेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती ढोल ताश्यांच्या गजरात उत्साहात साजरी...!💥अश्व रथातील छत्रपती शिवराय...घोड्यावर विराजमान माँसाहेब जिजाऊंच्या सजिव देखाव्यांसह ढोल ताशे लेझीम पथकाने वेधले सर्वांचेच लक्ष💥


पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) पुर्णा शहरात आज रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक 'जानता राजा' छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूक ढोल ताशे लेझीम पथकासह जय भवानी....जय शिवराय.....जय जिजाऊच्या गगनभेदी जयघोषात अत्यंत उत्साहपुर्ण धार्मिक वातावरणात पारंपारिक पध्दतीने संपन्न झाली.


पुर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील महादेव मंदिर संस्थान येथून सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास शिव प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार करीत पुजा करून भव्य शिव जन्मोत्सव मिरवणूकीस सुरुवात झाली या मिरवणूकीत त्रिशुल गणेश मंडळाच्या ढोल ताशे लेझीम पथकातील मुलींनी या शिवजन्मोत्सव मिरवणूकीत सर्वांचेच लक्ष वेधले महादेव मंदिर देवस्थान येथून निघालेली भव्य शिव जन्मोत्सव मिरवणूक पारंपरिक पध्दतीने वाजत गाजत शहरातील अंबानगरी,गुरु बुद्धीस्वामी देवस्थान परिसर,महाराणा प्रताप चौक,श्री.दत्त मंदिर परिसर,संत नरहरी महाराज चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थावर आल्यावर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पुन्हा भव्य शिव जन्मोत्सव मिरवणूक महात्मा बसवेश्वर चौकात आल्यानंतर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


या भव्य शिव जन्मोत्सव मिरवणूकीत त्रिशुल गणेश मंडळातील विशेष वेशभूषेतील लेझीम पथकातल्या मुल मुली व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज...राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या वेशभूषेमध्ये अश्वरथ ऊंठावर व घोड्यावर स्वार सजिव देखाव्यांनी तमाम पुर्णेकरांचे लक्ष वेधले पूर्णा शहरासह ग्रामीण भागातून देखील शिवजयंती साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी मिरवणूकीत हजेरी लावली होती.


शिव जन्मोत्सव मिरवणूक वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थावर पोहोचल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णा कृती पुतळ्यासमोर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने कडे चोट बंदोबस्त जागोजागी तैनात करण्यात आला होता.

💥शिवजन्मोत्सवात पोलिस प्रशासनाने निभावली अत्यंत महत्वपुर्ण भुमिका :-


पुर्णा पोलिस स्थानकाचा पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव गावडे यांनी शिवजन्मोत्सव मिरवणूकीत अत्यंत महत्वपुर्ण भुमिका निभावत या शिव जन्मोत्सवात जनसामान्यांचे लक्ष वेधले शिव जन्मोत्सव मिरवणूकी दरम्यान पो.नि.मारकड यांनी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना पोलिस दलाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना महापुरुषांचा जयजयकार करीत मिरवणूकीत सहभागी शिवभक्तांचा उत्साह वाढवला सदरील मिरवणूक अत्यंत शांततेत व धार्मिक वातावरणत पार पडली याचे सर्व श्रेय पुर्णेतील सर्वधर्मिय समाज बांधव शिवभक्तांसह पोलिस दलाला देखील जाते.....

   ✍🏻वृत्त विशेष :- चौधरी दिनेश (रणजीत)टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या