💥सेलू तहसील कार्यालयात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची यादी प्रसिद्ध....!


💥माहिती अद्ययावत करण्याचा शेवटचा दिवस💥

परभणी (दि.06 फेब्रुवारी) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र शासनाने 13 व्या हप्त्याच्या लाभ अदा करण्यासाठी सेलू तालुक्यातील पी.एम. किसान संकेतस्थळावरील लाभार्थ्यांची माहिती भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे माहिती अद्ययावत करून प्रलंबीत लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालय सेलू येथे डकवण्यात आली आहे. यादीमधील सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे सातबारा, फेरफार नक्कल, पती व पत्नी यांचे आधार कार्ड, बँक पासबुक याची प्रत संबंधित तलाठ्याकडे जमा करावी, असे आवाहन तहसीलदार दिलीप झांपले यांनी केले आहे. 

सेलू तालुक्यातील लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न करणे व ई-केवायसी करणे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे डकवली असून, यादीमधील लाभार्थ्यांनी ग्रामसेवकामार्फत बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी मंगळवारपर्यंत करून घ्यावेत, असे त्यांनी कळविले आहे. शेतकऱ्यांनी डाटा दुरुस्ती (आधार व पी. एफ. एम.एस) करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे, प्रलंबित लाभार्थ्यांनी 7/12, फेरफार व होल्डींग नक्कल, पती व पत्नी आधार कार्ड, बँक खाते, संनियत्रण अधिकारी यांचा स्वयंस्पष्ट अहवाल व स्वयंघोषणापत्र जमा करावेत, असे तहसीलदार झांपले यांनी कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या