💥नव्या अत्याधुनिक चकचकीत रुपात आलेल्या देवगिरी एक्सप्रेसचे परभणी स्थानकावर जोरदार स्वागत...!


💥यावेळी चालकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला💥

परभणी (दि.14 फेब्रुवारी) - नव्या कोऱ्या अत्याधुनिक अश्या एल एच बी कोच सह नवीन रुप धारण केलेल्या देवगिरी एक्सप्रेस चे आज परभणी स्थानकावर रात्री साडे आठ वाजता दाखल होताच मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.


                                
सिकंदराबाद ते मुंबई असा 600 किमी प्रवास करणारी देवगिरी एक्सप्रेसला नवीन एल एच बी कोचेस मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती अखेर काल दिनांक 13 फेब्रुवारी पासून ही मागणी मान्य झाल्याने देवगिरी एक्सप्रेसला नवा कोरा चकचकीत असा अत्याधुनिक एल एच बी रॅक मिळाला आहे .ही गाडी काल रात्री परभणी येताच मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने अरुण मेघराज,प्राचार्य सुरेश नाईकवाडे,सुरेश छत्रपती, दिनेश नरवाडकर, विठ्ठल काळे आदी सदस्यांनी गाडीचे स्वागत केले यावेळी चालकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी परभणी चे खा. संजय जाधव उपस्थित होते . प्रवासी महासंघाने या देवगिरी एक्सप्रेस ला पूर्वीच्या तुलनेत जनरल स्लीपरचे 3 डब्बे कमी झाल्याने 246 सीट कमी झाल्याने प्रवाशयाना आरक्षणाचा त्रास होणार असल्याची बाब खासदार महोदयांच्या लक्षात आणून दिली तसेच परभणी स्थानकावरील नवीन दादरा खुला करण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करण्याची विनंती केली असता खा.जाधव यांनी आपण वरील दोन्ही मागण्यासाठी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या