💥परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या दि.०६ फेब्रुवारी रोजी एलआयसी कार्यालया समोर आंदोलन....!


💥काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन💥

परभणी (दि.०५ फेब्रुवारी) - परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या सोमवार दि.०६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता स्टेडीयम समोरील एलआयसी (LIC) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.काँग्रेस कमेटीच्या वतीने सोमवार दि.६ फेब्रुवारी रोजी एलआयसीच्या कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या धरणा आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आ.सुरेशराव वरपुडकर हे करणार असून या आंदोलनात यांच्या नेतृत्वात नदीम इनामदार,भगवानराव वाघमारे नाना राऊत यांची प्रमूख उपस्थीती राहणार आहे.


सदर आंदोलनास आजी माजी खासदार व आमदार,तसेच आजी माजी जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, नगरसेविका तालुका ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस,एनएसयुआय,महिला काँग्रेस, सेवादल, आल्पसंख्यांक ,ओ.बी.सी.सेल.मागास्वर्गीय सेल.किसान काँग्रेस,इंटक संघटना,तसेच सर्व सेलचे प्रमुख,काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.सुरेशराव वरपुडकर,शहराध्यक्ष नदीम इमानदार,काँग्रेस प्रवक्ता तथा मिडिया प्रमुख इंजि.सुहास पंडीत यांनी केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या