💥पुर्णा येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी.....!


💥श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा विद्यापीठाचे मा.अधिसभा सदस्य प्रा.गोविंद कदम यांची प्रमुख उपस्थिती💥 

पूर्णा (दि.२० फेब्रुवारी) - पुर्णा शहरातील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात स्वराज्य संस्थापक, कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रा.गोविंद कदम तसेच प्रभारी प्राचार्य डॉ संजय दळवी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने या शिवजयंतीच्या मुहूर्तावर “जय जय महाराष्ट्र माझा” या शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतास राजयगीताचा दर्जा दिला आहे.  त्या गीताचे आज महाविद्यालयात गायन करण्यात आले. 

प्राचार्य डॉ के राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ संजय दळवी यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ अजय कुऱ्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री उमाकांत मिटकरी, प्रा बाळासाहेब मुसळे, मुख्य लिपिक बाळासाहेब कुलकर्णी, वसंत कदम, अशोक कदम, विनायक कदम, दत्ता जाधव,    नागोराव सावळे, गणेश सोळंके, कालिदास वैद्य तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या