💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी....!


💥आदिवासी समाजाच्या पालाच्या वस्तीवर जावून लोकराजे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी💥

परभणी - आज प्रहार जनशक्ती पक्षाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून समाजात एक वेगळा सकारात्मक संदेश दिला. परभणी शहरालगत असलेल्या तात्पुरती पाल बांधून राहणाऱ्या व पोटापाण्या साठी सतत वेगवेगळ्या गावात भटकंती करणाऱ्या अत्यंत दुर्लक्षित अश्या आदिवासी समाजाच्या पालाच्या वस्तीवर जावून लोकराजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या नंतर पालावर राहणाऱ्या लोकांना हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी संपूर्ण वस्तीचा परिसर दनानुन गेला या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संपूर्ण वस्तीत मिठाई चे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर चिटणीस वैभव संघई, मिडिया प्रभारी नकुल होगे, सुरेश तोडासे, उमेश तोडासे, प्रदीप तोडासे, गजरा तोडासे, गीता अत्राम, रंजीता शिळाम, लजनु तोडासे, त्रिंबक तोडासे, बाबाराव तोडासे, रवी वाळवे, नागेश अत्राम, राम तोडासे, अजय तोडासे, शिवाजी तोडासे, लखन तोडासे यांच्या सह महिला व पुरुषाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या