💥जिंतूर येथील कै.किशनराव चव्हाण शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न....!💥राष्ट्रवादीच्या युवा जिल्हाध्यक्षा प्रेक्षाताई भांबळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.01 फेब्रुवारी) - जिंतूर येथे काल मंगळवार दि.31 जानेवारी 2023 रोजी कै.किशनराव चव्हाण शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले.याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. या वार्षिक स्नेहसंमेलन दुपारी 11:45 वाजता राष्ट्रवादीच्या युवा जिल्हा अध्यक्षा प्रेक्षाताई भांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले लहान मुलांच्या कलागुणांचा अविष्कार पाहण्यासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी गोफने, गटशिक्षण अधिकारी गांजरे, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज थिटे, गणेश ईलग, साबिया बेगम फारुकी, मधुकर भवाळे, मनीषाताई केंद्रे, सारंग महाराज ,पत्रकार आदी अनेक नागरिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती रामराव उबाळे यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेचे चव्हाण व शिकरे सर यांनी केले. तर आभार उबाळे सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी कुलाल, वाकळे, लिखे, चव्हाण, शिकरे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या