🌟पुर्णा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचा स्तुत्य उपक्रम.....!


🌟पूर्णा शहरातील दिव्यांग विधवा व भिक्षेकरी गोरगरिबांना बुंदीलाडु सह रेशनकार्ड वाटप🌟


पुर्णा : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार व परभणी जिल्हाप्रमुख मा.शिवलिंग भाऊ बोधने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरातील शासकीय स्वस्त धान्यापासून वंचितांचा माहे ऑक्टोबर 2022 मध्ये सर्व्हे करण्यात आला, यामध्ये पूर्णा शहरातील असंख्य भिक्षेकरी गोरगरिबांना शासकीय धान्याचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले, उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड व तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के यांच्या सहकार्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी शाखा प्रमुख अय्युब शाह व अकबरी बेगम यांच्या प्रयत्नाने तहसील कार्यालय पूर्णा अंतर्गत पूर्णा शहरातील 19 दिव्यांग, 4 विधवा व 51 गोरगरिबांना शासकीय स्वस्त धान्य मिळावे यासाठी रेशनकार्ड बनउन सोमवार दि.27 रोजी अली नगर येथे वाटप करण्यात आले.


पूर्णा शहरातील अपंग, विधवा व भिक्षेकरी गोरगरिबांना शासकीय स्वस्त धान्य मिळण्याचे रेशनकार्ड बुंदीचे लाडू देऊन वाटप करण्यात आले, प्रमुख पाहुणे शिवलिंग बोधने, महेबूब कुरेशी, नागेश नागठाणे, नरेश जोगदंड, प्रकाश गायकवाड, विनोद गायकवाड, मास्टर अनिल आहिरे, सुशील गायकवाड शे.सत्तार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते रेशनकार्डचे वाटप करण्यात आले, यावेळी बोधने यांनी उपस्थितांना आव्हान केले की प्रहारच्या संपर्कात येऊन आपली कामे करून घ्या, तर अय्युब शाहा यांनी गोरगरिबांनी नवीन रेशनकार्ड बनउन घेण्याचे आव्हान केले, क्रांती नगर शाखाप्रमुख अकबरी बेगम सय्यद मुनिर यांनी मान्यवरांसह उपस्थितीतांचे आभार व्यक्त केले केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या