💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील तरंगल याञेला उद्या रविवार दि.०५ फेब्रुवारी पासुन सुरुवात....!


💥सतत तिन दिवस चालणार ही तरंगल यात्रा💥

पूर्णा (दि.०४ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील तरंगल यात्रा ही संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असून पूर्णा शहरापासून अवघ्या ५ किलोमीटरवर पांगरा ढोणे हे गाव आहे ही यात्रा मागील तिन शतकापासून सातत्याने भरत असते तरंगल हनुमानाची मूर्ती अंदाजे एक टन शेंदुरात माखलेली आहे या यात्रेची फार जुनी परंपरा आहे.

पांगरा ढोणे येथील तरंगल यात्रेला उद्या रविवार दि.०५ फेब्रुवारी रोजी यात्रेस प्रारंभ होणार असून दि.०५ फेब्रुवारी ते ०७ फेब्रुवारी २०२३ अशी तिन दिवस याञा चालणार असून उद्या रविवारी सायंकाळी ०५-०० वाजता पांगरा ढोणे गावातील प्रत्येक घरी पुरणपोळीचा नैवेद्य व आरती घेऊन गावातील लेकीबाळी,सुनांसह लहान मुलापासून ते वयोवृद्ध महिला मंडळी श्रींना आरती घेऊन वाजत गाजत ढोल ताशा च्या गजरात ओवाण्यासाठी येत असतात व सोमवार दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी परभणी नांदेड हिंगोली व महाराष्ट्र,आंध्रप्रदेश कर्नाटक अशा राज्यातील भाविक हनुमानाच्या दर्शनाला नित्यनेमाने येत असतात हा मारुती नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो व आजूबाजूच्या गावातील भाविक बैलगाडीने यात्रेमध्ये दर्शनासाठी सामील होत असतात ही  याञेची जुनी परंपरा आहे व तसेच रविवारी पहाटे पाच वाजता दिपक  गुरु जोशी यांच्या मंत्रोपचाराने, दही,दुध, साकर मध, टाकुन  श्रींचा जल अभिषेक केला जाणार आहे  पूर्णा तशिलदार श्रीमती पल्लवी टेमकर व गावातील मानाचा अभिषेक श्री तुकाराम सदाशिव ढोणे- पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल या याञेमध्ये चुडावा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मुळे सर यांनी चौक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस स्टेशनकडून मिळाली आहे  आलेल्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था लगतच असलेल्या दीपक जोशी यांच्या रीकाम्या शेतामध्ये केली जाणार आहे.आजपासुन मिठाईचे दुकाने . आकाश पाळणे. इतर दुकानेही थाटली आहेत तरी या यात्रेमध्ये परिसरातील भाविकांनी व दुकानदारांनी सामील व्हावे असे आवाहन पांगरा ढोणे ग्रामस्थांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या