💥राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्ते प्रारंभ....!


 💥नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे💥


परभणी (दि.21 फेब्रुवारी) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-2023 अंतर्गत ‘चला जाणुया नदीला’ आणि ‘बालविवाहमुक्त परभणी’ तसेच अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-2023 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्ररथाला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जावून प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.


सामाजिक न्याय विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह, अनुसूचित जाती मुला-मुलींकरिता शासकीय निवासी शाळा आणि ऊसतोड कामगारांच्या योजना, तृतीयपंथी हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ या शासनाच्या कल्याणकारी योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जावून प्रसिध्दी करणार आहे. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून पात्र व गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

            चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ‘चला जाणुया नदीला’ आणि ‘बालविवाहमुक्त परभणी’ आणि अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह, ऊसतोड कामगारांच्या योजना आणि तृतीयपंथी हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. 

यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सुशांत शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कैलास मठपती, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, सामाजिक न्याय विभागाच्या लक्ष्मी गायके, महिला बाल विकास विभागाच्या मनिषा तांदळे, जि.प.चे महिला व बाल कल्याण विभागाचे सदानंद पेकम, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, गजानन शिंदे, एकनाथ मुजमुले आदींची उपस्थिती होती.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या