💥कु.निकिता पंजाब जाधव 'शाळारत्न' पुरस्कारकाराने सन्मानीत....!


💥विद्यार्थ्यांना स्व.वसरामजी जिवला नाईक राठोड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बिभीषण राठोड यांच्यातर्फे दिला जातो शाळारत्न पुरस्कार💥 

जिंतूर  प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केहाळ तांडा येथे सांस्कृतिक कार्यक्रमासोबत आनंदनगरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये शाळेतून सर्वगुणसंपन्न अशा विदयार्थ्यांना स्व. वसरामजी जिवला नाईक राठोड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बिभीषण राठोड  यांच्यातर्फे दिला जाणारा या वर्षीचा शाळारत्न पुरस्कारासाठी कु. निकिता पंजाब जाधव यांची निवड करून कु. निकिता सह तिचे आजी-आजोबा अंकुशराव जाधव आणि सरुबाई जाधव यांचा मुख्याध्यापक पलमटे सर, शा. व्य. स. अध्यक्ष संजूदादा, उपाध्यक्ष अनिल जाधव तसेच मानेसर, माकोडेसर, अन्नदातेसर, सुधाकर जाधव, राहुल जाधव, नामदेव जाधव, सुभाष राठोड, बाळु जाधव, विठ्ठल जाधव, विलास चव्हाण, माधव राठोड, चतरु चव्हाण, प्रकाश जाधव या सर्वांच्या उपस्थितीत शाल श्रिफळ, ट्राफी, शब्दकोश, आणि 501/- रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल संपूर्ण परिसरात तिचे अभिनंदन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या