💥पुर्णेत भारतीय चलनातील दहा रुपयांच्या कॉईनवर व्यापाऱ्यांनी टाकला बहिष्कार ?


💥दुकानदार व्यापारी दहा रुपयांचे कॉईन स्विकारण्यास नकार देत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था💥 

पूर्णा (दि.१५ फेब्रुवारी) - शहरासह संपूर्ण तालुक्यातील लहान/मोठे दुकानदार व्यापारी भारतीय चलनातील १० रुपयांचे कॉईन (नान) स्विकारण्यास सपशेल नकार देत असल्यामुळे सर्वसामान्य नागरीक ग्राहकांमध्ये संभ्रामावस्था निर्माण झाली असून सदरील १० रुपयांचे कॉईन (नानी) भारतीय चलनातून भारतीय रिझर्व्ह बँकेने बंद केली की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

भारतीय चलनातील करंन्सी अश्या प्रकारे नाकारणे म्हणजे हा देशाचा अवमान आहे ही नाणी बंद बाबत रिजर्व्ह बँकेने कोणतेही आदेश काढलेले नसतांना पुर्णा शहरासह तालुक्यातील लहान/मोठे दुकानदार व्यापारी ही १० रुपयाची कुठल्याही प्रकारची बंदी नसलेली नाणी स्विकारण्यास नकार का देतात या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन भारतीय चलनातील १० रुपयांची कॉईन (नानी) स्विकारण्यास नकार देणाऱ्या दुकानदार/व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राज ठाकर यांनी देखील केली आहे.....    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या