🌟टाळमृर्दुंग हरीनामाच्या गजरात श्री मुंगसाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा...!

🌟ऋषीतुल्य कर्मयोगी तात्यासाहेबांच्या रक्षा दर्शनाला उसळली अलोट गर्दी🌟  

✍️ मोहन चौकेकर 

चिखली : शैक्षणीक क्रांतीसह सहकार क्षेत्राला उभारी देणारे कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांचे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले होते. आज श्री मुंगसाजी महाराजाच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या पावन पर्वप्रसंगी कर्मयोगी स्व.तात्यासाहेब यांच्या रक्षा दर्षनाचा योग जुळून आला. कर्मयोगी तात्यासाहेबांच्या रक्षा दर्षनाला जिल्हाभरातुन राजकीय, सामाजिक, शैक्षणीक, सहकार, धार्मीक, अध्यात्मीक क्षेत्रातील मान्यवरांची अलोट गर्दी उसळली होती. जिल्हभरातुन आलेल्या दिंडयांच्या सहभागाने टाळमृर्दुंग हरिनामाच्या गजरात श्री मुंगसाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हभप श्री ज्ञानेष्वर महाराज शेलुदकर (भोकरदन) यांचे किर्तन तर जिल्हा ग्रथालयाचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ. कि.वा.वाघ बुलडाणा यांचे प्रवचन यावेळी संपन्न झाले.

आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी ।

बोलीले जे ऋषी। साच भावे वर्ताया ।।

श्री मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी अनुराधा नगरीतील श्री मुंगसाजी महाराज मंदिर परीसरातील भव्य दिव्य सभामंडपात हभप श्री ज्ञानेष्वर महाराज शेलुदकर, भोकरदन यांचे किर्तन व जिल्हा ग्रथालयाचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ. कि.वा.वाघ बुलडाणा यांचे प्रवचन संपन्न झाले. यावेळी परीसरातुन सुमारे 45 हुन अधिक दिंडयासह शेकडो टाळधारी वारकरी पुरूष व महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी हभप श्री ज्ञानेष्वर महाराज शेलुदकर यांनी आपल्या किर्तनातुन प्रबोधन करीत ते म्हणाले की, महात्म्याचं चिंतन जरी केल तरी मानवी जिवनातील प्रायष्चित कमी होत. सुर्य हा सुर्यासारखा असतो तसे कर्मयोगी तात्यासाहेब होते. कर्मयोगी तात्यासाहेब जरी देहाने आपल्यातुन गेले असले तरी त्यांनी केलेल्या विषाल कार्याची फलश्रुती पाहता त्यांचे नाव व किर्ती चंद्र सुर्याप्रमाणे आजन्म राहील. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी आपले आयुष्यभर संतांची जवळीक साधुन त्यांच्या संपर्कात राहले त्यामुळे त्यांचे जिवन सफल झाले. त्यांनी आपल्या मुलांसाठी किती संपत्ती षिल्लक ठेवली याची विचारणा होणार नाही, पण त्यांनी उभारलेले अध्यात्मीक,धार्मीक, शैक्षणीक,औद्योगिक व सहकार क्षेत्रातील केंद्र त्यांच्या कर्तृत्वाचा मानवी जिवनावर प्रभाव पाडल्याषिवाय राहत नाही. तुकोबारायानी म्हटल्या प्रमाणे आई वडीलांची सेवा ही सर्वोत्कृष्ठ सेवा असुन ती सेवा बोंद्रे कुटूंबियांनी केली यातच समाधान दडले असल्याचे उद्गारही हभप ज्ञानेष्वर महाराज शेलुदकर यांनी आपल्या किर्तन प्रसंगी काढले.

श्री मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या प्रवचनातुन उपस्थितांना संबोधीत करतांना प्रा.डाॅ. कि.वा.वाघ यावेळी म्हणाले की, ज्ञानदेवाने श्रोत्यांना अधिक महत्व दिले असुन महापुरूषांच्या संगतीत संस्कार प्राप्त होतात, आणी त्या संस्कारातुन मानवी जिवनाला आकार येतो. जिवनात कमी बोला, जास्ता पहा, अधिका अधिक श्रवण करा त्यातुन जिवनात वेळ मिळतो, त्याला जिवन म्हणातात व केलेल्या नामस्मरणामुळे देवाचे अधिष्ठाण प्राप्त होवुन आपल्या हातुन मोठे कार्य होते. यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रेरणेतुन परोपकार हा धर्म आहे, देव पुजनापेक्षा मुला बाळांना षिकवा, व्यवसनाधितेला टाळा, दिन दुबळया भुकेल्यांच्या मदतीला धावुन जा, असे सांगित प्रा.डाॅ. कि.वा.वाघ यांनी संत गाडगेबाबांच्या जिवन चरित्रावर आपल्या प्रवचनातुन प्रकाष टाकला.

श्री मुुंगसाजी महाराज पुण्यतिथ महोत्सवात बाहेरगावा वरून असंख्य दिंडया सहभागी झाल्या. दिंडीतील वारकरी, टाळकरी व भजनी मंडळीच्या उपस्थितीत टाळमृर्दुंग व हरिनामाच्या गजरात संपुर्ण परीसर भक्तीमय झाला होता. ऋषीतुल्य कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांचे रक्षा दर्षन व श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी मोठया संख्येने नागरीक व भाविक भक्त सहभागी झाले होते. श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. वरील सर्व कार्यक्रमाच्या यषस्वी पार पाडण्याकरीता श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाण, अनुराधा परीवारातील पदाधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या