🔴राज्य शासनाच्या कृषि योजनांच्या निधी पूर्ततेसाठी ‘महाडीबीटी’ वर कागदपत्रे अपलोड करा.....!


🔴असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी केले🔴 

परभणी (दि.24 फेब्रुवारी) : राज्य शासनाच्या कृषि विभागांशी संबंधित विविध योजनांचा लाभ घेतलेल्या, मात्र आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची राहून गेली आहेत. अशा गरजू व पात्र लाभार्थ्यांनी उर्वरित निधी मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सर्व कागदपत्रे तात्काळ अपलोड करावीत,असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी केले आहे.

सन २०२१-२२ मध्ये मंजूर कामाची दोन वर्षाची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपत आहे. मंजूर कामे १५ मार्चपूर्वी बांधकामासह पूर्ण करावीत. या योजनेच्या संदर्भात लाभार्थ्यांची अडचण असल्यास कृषि अधिकारी, पंचायत समिती, कृषि विभाग, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना,बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विद्युत आकार भरणा, पंपसंच आदींसाठी राज्य शासनाच्या ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही संपूर्ण कागदपत्रे अपलोड केली नाहीत. तसेच कागदपत्रे लवकर अपलोड केल्यास मंजूर कामाचे कार्यारंभ आदेश लवकर देता येतील व त्यांना ३१ मार्च २०२३ पूर्वी आर्थिक लाभ मिळतील. कार्यारंभ आदेश लवकर मिळाल्यास नवीन विहिरीची कामे याच उन्हाळ्यात बांधकामासह पूर्ण करता येतील. कागदपत्रे उशिरा अपलोड केल्यास कार्यारंभ आदेश उशिरा मिळतील व विहिरीची कामे कामे उशिरा सुरु होतील. पावसाळ्यापूर्वी विहिरींची कामे बांधकामासह पूर्ण होऊ न शकल्याने पावसाळ्यात विहिरी ढासळतील. तसेच त्या गाळाने भरल्यास शेतकऱ्याचे नुकसान होईल व अनावश्यक खर्च वाढेल, असेही त्यांनी कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या