🌟मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन....!


🌟केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना सुरू🌟

परभणी (दि.27 फेब्रुवारी) : केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या सवलतीस पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी एकुण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा 25 टक्के रक्कमेपैकी जास्तीत-जास्त 15 टक्के मार्जिन मनी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेकरिता जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इच्छुक लाभार्थ्यांनी केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेकरीता सहायक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांच्याकडे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून आपले प्रस्ताव  सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.....    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या