💥पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांला ५० लाखांची मदत, मुलाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी - शिवसेना (उध्दव ठाकरे)


💥पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना उभी राहणार -- संजय राऊत 

✍️ मोहन चौकेकर 

रत्नागिरी - शासनातर्फे मृत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या मुलाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

 रत्नागिरी येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांची आज शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार राजन विचारे यांनी सांत्वनपर भेट घेतली तसेच शिवसेना पूर्ण सर्व ताकदीनिशी सदैव वारिसे कुटुंबीयांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही खासदार संजय राऊत यांनी दिली तसेच वारीसे यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची रोख रक्कम सांत्वन पर मदत म्हणून शिवसेनेतर्फे देण्यात आली आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या