💥पुर्णा तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज विद्यालयात शिवजन्मोत्सवा निमित्त विभागीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न...!


💥विभागीय वक्तृत्व स्पर्धेत परमेश्वर झाडे प्रथम तर गायत्री बुचाले द्वितीय💥

पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील छत्रपती संभाजी महाराज विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त आयोजित विभागीय वक्तृत्व स्पर्धेत परमेश्वर झाडे जिजाऊ विद्या निकेतन अंधारवाडी हिंगोली हा विद्यार्थी प्रथम ठरला तर छत्रपती संभाजी महाराज विद्यालय सुहागनची कु.गायत्री बुचाले ही विद्यार्थी द्वितीय ठरली.

तृतीय बक्षिस रुद्राक्षी ढोकणे(युनिव्हर्सल  स्कूल वसमत)चतुर्थ बक्षिसाचा मान प्रा.शा.आव्हई च्या दिव्या बुचाले हिला मिळाला.पाचव्या क्रमांकावर दिनानाथ मंगेशकर विद्यालय सातेफळची करुणा अंभोरे आणि उत्तेजनार्थ  अभिनव विद्या विहार च्या दुर्गा बोबडे व सरस्वती प्रा.शा.गंगाखेड च्या कविष  बेद्रे यांना मिळाले.

रोख रक्कम,शाळेचे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष हिराजी भोसले,उपाध्यक्ष  बळीरामजी भोसले,मुख्याध्यापक  मनोहर  कल्याणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले,सेवानिवृत्त शिक्षक  जनार्दन भोसले,छत्रपती मोबाईल चे गणेश बुचाले,यशोदीप अकादमीचे संचालक  संदीप भोसले आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  वाघमारे सर तर आभार  दहिफळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या