💥परभणी येथे समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अन्नदान.....!


💥खिचडी स्वरूपात अन्नदान करून वस्ताद लहुजी साळवे यांना अभिवादन करण्यात आले💥

परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व समाजहित अभियान प्रतिष्ठान चे कार्यकारी सदस्य विनोद वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी येणारे रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक तसेच गोर, गरीब, गरजू, भुकेल्यांना खिचडी स्वरूपात अन्नदान करून वस्ताद लहुजी साळवे यांना अभिवादन करण्यात आले व विनोद वाडेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या वेळी रयत मदत केंद्रचे संस्थापक अध्यक्ष बबन आण्णा मुळे, महालोकतंत्र चे सिद्धांत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सचिव रमेश घनघाव, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, विनोद वाडेकर, शंकर बनसोडे, दीपक बनसोडे, शुभम कोरडे, राजू घोगरे, वैभव गायकवाड, रामसिंग अंभोरे, शिलवंत घनघाव, तेजस हिवाळे, शिवाजी गवळे, रोहन काळे, अभिजित सोनावणे, अजय अंभोरे, पृथ्वीराज काळे, इम्रान सय्यद आदींची उपस्थिती होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या