💥पुर्णेतील श्री.दत्त मंदिर देवस्थान येथे श्री गुरु चरित्र पारायन सप्ताहाचे आयोजन...!


💥उद्या बुधवार दि.२२ फेब्रुवारी पासून श्री.गुरु चरित्र पारायन सप्ताहास सुरुवात : सप्ताहात नामांकीत किर्तनकारांच्या किर्तनाचे आयोजन💥

पुर्णा (दि.२१ फेब्रुवारी) - पुर्णा शहरातील श्री दत्तमंदिर देवस्थानात प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी प.पु.ब्रम्हीभूत श्री.अखंडानंद सरस्वती (ओक स्वामी) महाराज यांचे कृपा आशिर्वादाने श्री गुरुचरित्र पारायन सप्ताहास उद्या बुधवार दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरुवात होणार असून दि.०१ मार्च २०२३ रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे.

श्री गुरुचरित्र पारायन सप्ताहा दरम्यान दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ०६-०० वाजता 'पुजा/आरती/अभिषेक',सकाळी ०९-०० ते ११-०० वाजे दरम्यान श्री गुरुचरित्र 'पोथी वाचन' तर सायंकाळी ०७-०० ते ०८-०० वाजेपर्यंत 'पंचपदी'रात्री ०९-०० ते ११-०० वाजेपर्यंत किर्तन होणार असून या गुरुचरित्र पारायन सप्ताहात पोथीवाचन श्री.अरविंद गुरु जोशी हे करणार आहेत.


श्री दत्त मंदिर देवस्थान द्वारा आयोजित श्री गुरुचरित्र पारायन सप्ताहा दरम्यात बुधवार दि.२२ फेब्रुवारी रोजी श्री.हभप.डॉ.शरद अंबेकर वसमत जि.हिंगोली यांचे किर्तन तर गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी श्री.कृष्णा लिंबेकर परभणी यांचे किर्तन तर शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी श्री.हभप.संजय जोशी परभणी यांचे किर्तन तर शनिवार दि.२५ फेब्रुवारी रोजी श्री.हभप.शालिग्राम मुळे सेलू जि.परभणी यांचे किर्तन तर रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी श्री.हभप.कु.दिपालीताई कुलकर्णी परतूर जि.जालना यांचे किर्तन तर सोमवार दि.२७ फेब्रुवारी श्री.हभप.अवधुत महाराज टाकळीकर धनगर टाकळी ता.पुर्णा यांचे किर्तन तर मंगळवार दि.२८ फेब्रुवारी रोजी श्री.हभप.योगेश महाराज साळेगावकर सेलू जि.परभणी यांचे (हिंदु राष्ट्राची गरज - व्याख्यान)  किर्तन होणार असून किर्तन सोहळ्याचे स्थळ श्री मारोती मंदिर सराफा बाजार पुर्णा हे नियोजित करण्यात आले असून बुधवार दि.०१ मार्च २०२३ रोजी श्री गुरुचरित्र पारायन समाप्ती व दुपारी १२-०० ते ०३-०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी श्री गुरु चरित्र पारायन/किर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्ताश्रम सेवकांनी केले असून या गुरुचरित्र पारायन व किर्तन सोहळ्यात हार्मोनियम वादक दिपक डहाळे तर तबला वादक म्हणून कैलास कुडाळे हे राहणार आहेत या श्री गुरुचरित्र पारायन सोहळ्यात सहभाग नोंदवणाऱ्या भाविक भक्तांनी अभिषेक नोंदनी शुल्क/अन्नदान देणगी शुल्क श्री दत्तात्रय आश्रमात जमा करावी असे आवाहन श्री दत्ताश्रम समिती सेवकांकडून करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या