💥पुर्णेत महाशिवरात्री सर्वत्र उत्साहात साजरी : शनी मंदिर/महादेव मंदिरात शिवभक्त माता-भगिनींनी केली दर्शनासाठी गर्दी......!


💥शहरातील शनी मंदिरात शिवभक्तांनी सादर केला भव्य भोले शंकराचा देखावा : रांंगोळीतून साकारली 'महाकाल' प्रतिमा💥


पूर्णा : शहरासह संपूर्ण तालुक्यात महाशिवरात्र धुमधडाक्यात साजरी करण्यात आली तालुक्यातील गौर सर्कल मधील गौर येथील जागृत सोमेश्वर देवस्थान येथील सोमेश्वर मंदिर परिसरातील भव्य हेमाडपंथी बारवात शिवभक्तांनी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अक्षरशः दिपावली प्रमाणे हजारों दिव्यांचा झगमगाट केला तर याच सर्कल मधील कंठेश्वर येथील जागृत देवस्थान असलेल्या पुर्णा-गोदावरी नदीच्या संगमावरील अत्यंत पवित्र अश्या कोठेश्वर महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त भव्य जत्रा भरली होती.


तालुक्यातील ग्रामीण भागांप्रमाणेच पुर्णा शहरातील अत्यंत जागृत व पवित्र देवस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगर (कदम गल्ली) परिसरातील महादेव मंदिरात पहाटे ०४-०० वाजेपासूनच शिवभक्त माता-भगिनींसह भाविक भक्तांनी दर्शनासाठी येण्यास सुरुवात केल्यामुळे मंदिर परिसरात अक्षरशः यात्रेचे स्वरुप निर्माण झाले होते तर शहरातील महावीर नगर येथील शनी मंदिरात महाशिवरात्र निमित्त 'अवंतिकानाथ महाकाल परिवारा' तर्फे सुंदर व भव्य असा आकर्षक भगवान भोले शंकरांचा देखावा सादर करण्यात आला यावेळी शिवभक्तांनी रांगोळीतून महाकाल भगवान भोले शंकराची भव्य प्रतिमा साकारली महाशिवरात्र निमित्त भाविक भक्तांनी शनी मंदिर येथे प्रचंड गर्दी केली होती......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या