💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातिल महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


💥आता प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', राज्यात 500 दवाखाने सुरु होणार💥

✍️ मोहन चौकेकर

* काॅग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या महाराष्ट्रातील विश्वासू खासदार रजनी पाटील यांच निलंबन, सभागृहाच्या कामकाजादरम्यान व्हिडीओ बनविणे पडले महागात 

* मुंबईहून साईनगर शिर्डी आणि सोलापूरसाठी दोन स्वतंत्र 'वंदे भारत' ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील.. 

* चिंचवडची पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम; माघार नाहीच, कलाटेंनी मतं कोणाचा करणार गेम? की होणार स्वतः आमदार ?

* आता प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', राज्यात 500 दवाखाने सुरु होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 

* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच? सुप्रीम कोर्टाला सुनावणीला वेळ मिळेना, आता पुढची तारीख 14 मार्च 

* गौतमी पाटीलच्या वादात अजित पवारांची एन्ट्री

* राजधानीत बळीराजाचा पुन्हा एल्गार; 20 मार्चला संसदेबाहेर 'किसान महापंचायत' 

* महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढणार, अनेक भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता

* कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच ; प्रशासनाच्या ग्वाहीनंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द 

* 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', तुर्कीमध्ये NDRF ने वाचवला सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून एनडीआरएफच्या कामगिरीचं कौतुक 

* IND vs AUS 1st Test : दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला, भारत 144 धावांच्या आघाडीने मजबूत स्थितीत, जाडेजा-अक्षरचं अर्धशतक पूर्ण, कर्णधार रोहितची दमदार खेळी, नागपूर कसोटीत शतक ठोकत रचला इतिहास

* अदानी समूह-हिंडेनबर्ग: अदानी यांनी वॉचटेल या अमेरिकी लॉ फर्मला सोपवली कायदेशीर लढाईची जबाबदारी; पुढील सुनावणी 13 फेब्रुवारीला होणार व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' (गायीला मिठी मारण्याचा दिवस) साजरा करण्याचं आवाहन सरकारने घेतलं मागे; परिपत्रक केलं जारी

* तुर्की-सीरियातल्या भूकंपामुळे 21 हजारांहून अधिक बळी, जागतिक बँकेने तुर्कीला 1.78 बिलियन डॉलर्स मदत देण्याची केली घोषणा

* एकनाथ खडसेंना दिलासा! भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश, 20 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही

* अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा-अभिनेत्री कियारा अडवाणीचं लग्न OTT वर पाहता येणार? Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मला हक्क विकल्याच्या चर्चा 

* रिषभ पंतने क्रॅचच्या मदतीने चालतानाचे दोन फोटो केले शेअर, कॅप्शनमध्ये म्हणाला- One step forward, One step stronger, One step better

* ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश; मनसेचे ठाण्यातील माजी विभाग अध्यक्ष महेश कदम, भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन वाघमारेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश 

* 22 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबईत: पंतप्रधान मोदींकडून 2 वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, मुंबईहून शिर्डी आणि सोलापूरचा प्रवास कमी वेळेत करता येणार

*एकता कपूर आणि आई शोभा यांनी अल्ट बालाजीच्या प्रमुखपदाचा दिला राजीनामा

* सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली भारतात बीबीसीवर बंदी घालण्याची याचिका; म्हटले- 'सेन्सॉरशिप लादू शकत नाही, आमचा वेळ वाया घालवू नका'

* पुण्यातील हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल आजपासून तीन दिवस बंद; प्रशासनाकडून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच आवाहन

* जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा सहा तास ठप्प:शहरातील 35 पैकी 30 जलकुंभाचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला; उद्या होणार पाणी पुरवठा

* गडचिरोलीत शिक्षण झालेल्या मुलाला मानाचं पान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा खासगी सचिव म्हणून नियुक्ती

*गोकूळने दूधाच्या दरात केली वाढ: म्हशीच्या दूध दरामध्ये 3 रुपये वाढ होऊन 72 रूपये लीटर तर गायीच्या दुधात 2 रुपयांची वाढ होऊन 56 रूपये लीटर दराने मिळणार

*  राम जन्मभूमी उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अहमदनगरमधून अटक: प्रेयसीच्या भावाला अडकवण्यासाठी रचला होता कट, पत्नीसह अटक करून अयोद्धेत पोलिसांकडून चौकशी सुरू

* मुकेश अंबानी उत्तर प्रदेशात 1 लाख नोकऱ्या देणार, उत्तर प्रदेशात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची केली घोषणा 

* शेअर बाजार: आज बाजारात घसरण; सेन्सेक्स 60,682.70 (-123) वर तर निफ्टी 17,856.50 (-36) वर बंद......

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या