💥बिड जिल्ह्यात शेतकरी विम्याचा झोल आणि बँकांनी घातलाय घोळ....!


💥शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले सर्व पैसे बॅंकांनी परस्पर घेतले काढून💥

बीड जिल्हयातील असंख्य शेतकऱ्यांनी खरीप विमा भरला होता.. अतिवृष्टी झाल्याने विमा मंजूर झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचा पहिला हप्ता जमा झाला.. मात्र नंतर  डबल एन्ट्री झाल्याचं कारण देत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले सर्व पैसे बॅंकांनी परस्पर काढून घेतले.. हा गुन्हा आहे.. शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय बँकांना असे पैसे काढता येत नाहीत.. तरीही पैसे काढले गेले.. माझ्या कुटुंबात सात खाती आहेत.. या सर्व खात्यावरून आमच्या परस्पर स्टेट बँक ऑफ इंडिया, मराठवाडा ग्रामीण बँकेनी जवळपास दीड लाख रूपये  काढून घेतले आहेत..

माझ्या ग्रामीण बँकेतील खात्यावर ८८६० आणि २३६९२ अशी रक्कम ३० डिसेंबर रोजी जमा झाली.. ही सर्व रक्कम दोन एन्ट्रीव्दारे २ फेब्रुवारी रोजी माझ्या परस्पर काढून घेतली गेली.. मी बँकेकडे चौकशी केल्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी माझ्या खात्यावर ११,८४६ आणि ४४३० रूपये जमा केले गेले.. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियातून माझ्या अन्य खात्यावरून परस्पर जी रक्कम काढली गेली ती नंतर जमा झाल्याचे मेसेज आले नाहीत.. माझी आई लिलाबाई माणिकराव देशमुख यांच्या खात्यातून परस्पर ४० हजार रूपये काढले गेले.. 

एखादी व्यक्ती किंवा कंपनीकडून एखाद्या खात्यावर जमा झालेली रक्कम बँकांना परस्पर काढता येते का? एखाद्या खातेदाराच्या स्वाक्षरीत थोडा फरक पडला तरी बँका प्रचंड छळतात.. असे असताना एवढ्या मोठ्या रक्कमा खातेदारांच्या परस्पर कश्या काय काढून घेतल्या जातात? मी शुक्रवारी स्टेट बँकेत चौकशी करणार आहे.. माझे समाधान झाले नाही तर बँकेच्या विरोधात मी पोलिसात तक्रार देणार आहे.. गरज पडली तर कोर्टातही जावे लागेल... कारण हा केवळ माझ्या कुटुंबाचा विषय नाही.. बीड जिल्ह्यातील शेतकरयांच्या खात्यातून जवळपास साडेचार कोटी रूपये परस्पर काढले गेले आहेतअशी माझी माहिती आहे.. . हा मोठा घोटाळा आहे आणि जिल्ह्यातील एकही पुढारी यावर बोलत नाही..वडवणीत युवराज शिंदे यांनी आवाज उठविला होता.. मात्र अन्य कोणी बोलले नाही.. 

यासंदर्भात आज विमा कंपनीशी संपर्क साधला असता.. त्यांनी आम्ही बँकांना पैसे काढून घेण्याच्या कोणत्याही सूचना केल्या नसल्याचे सांगितले.. जे काही घडले त्याच्याशी आमचा काही संबंध नाही म्हणत विमा कंपन्या हात झटकतात.. मग नेमकं काय झालं हे शेतकरयांना कळलं पाहिजे...

शेतकरी विमा हा विषय अनेकांसाठी कूरण ठरला आहे.. २०२० च्या विमयासाठी उस्मानाबादचे शेतकरी कोर्टात गेले तेव्हा त्यांना विम्याची रक्कम देण्याचे आदेश कोर्टाने दिले.. बीड मधील शेतकरी अजूनही २०२० च्या विम्याच्या प्रतिक्षेत आहेत..ही रक्कम शेकडो कोटींची आहे.. हा मोठा झोल आहे.. विमा कंपन्यांचे राजकीय लोकांशी कनेक्शन असल्याची चर्चा बीडमध्ये खुलेआम सुरू असते..म्हणूनच शेतकरयांची लुबाडणूक करणारया विमा कंपन्यांच्या विरोधात एकही शेतकरी ब्र देखील काढत नाही....

✍🏻धन्यवाद साभार : एस.एम.देशमुख यांच्या फेसबूक पेजवरून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या