💥पूर्णेत दक्षिण मध्य रेल्वे प्रशासना विरोधात नागरिक संतप्त : एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन संपन्न...!


💥दमरे प्रशासनाचा नियोजित इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड पळवण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यास पुर्णेकर सज्ज💥पुर्णा (०८ फेब्रुवारी) - ब्रिटिश/निजामकाळापासून संपूर्ण मराठवाड्यात सर्वात महत्वाचे व भौगोलिक/प्रशासकीय दृष्ट्या मध्यवर्ती सर्वात मोठे रेल्वे जंक्शन असलेल्या पुर्णा जंक्शन वरील रेल्वेची असंख्य महत्वपुर्ण कार्यालयांसह पुर्णेकरांचे हक्काचे विभागीय व्यवस्थापक कार्यालय अर्थात (DRM Office) नांदेडला पळवल्यानंतर देखील आत्मा संतुष्ट न झालेल्या राजकीय असंतुष्टांस दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील भाषावाद/प्रांतवादाला प्राधान्य देणाऱ्या मराठीद्वेष्ट्या अधिकाऱ्यांनी व असंतुष्ट राजकारण्यांनी आपला उचलेगिरीचा कारभार अद्यापही थांबवलेला नसून पुर्णेत सर्व सोईसुविधांस तब्बल १८० एक्कर जमीन उपलब्ध असतांना पुन्हा आपल्या संकुचित विषारी मराठीद्वेष्टेपणाचा प्रत्यय देत पुर्णेकरांच्या हक्काचे रेल्वेचे इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड नांदेड येथे बनवण्याचा कुटील डाव रचल्यामुळे आज बुधवार दि.०८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० ते २:०० वाजता संतप्त पूर्णेकरांच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर ०४ च्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करुन लोकशाही पध्दतीने निषेध केला. 


भारतीय रेल्वेच्या मुख्य उद्देश सेवा आणि अविकसित क्षेत्राचा विकास करणे हा आहे ब्रिटिश कालांतरा पासून चालत असलेल्या पूर्णा शहर रेल्वेचे माध्यम प्रवाशांच्या सेवासाठी प्रसिद्ध आहे परंतु मागील तिन/साडेतीन दशकापासून सातत्याने पूर्णा जंक्शन येथील रेल्वेची अनेक महत्वाची कार्यालय नांदेड येथे स्थलांतरीत करण्याचे महापाप प्रांतवाद/भाषावादाला खतपाणी घालणारे दमरेचे अधिकारी/कर्मचारी व कपटी असंतुष्ट राजकारण्यांकडून केले जात आहे तसेच दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनात मराठवाड्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन म्हणून नावारूपाला आलेले पूर्णा जंक्शन भौगोलिक प्रशासकीय दृष्ट्या मध्यवर्ती क्षेत्र असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखले जाते परंतु इथल्या प्रांतवाद भाषावादाचे विष कालवणाऱ्या मराठीदृेष्ट्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह काही असंतुष्ट कपटी असंतुष्ट राज्यकर्त्यांनी  पूर्णेच्या हक्काचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नांदेड येथे पळवण्याचे काम केले यावरही त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही आणि या असंतुष्ट दृष्ट आत्म्यांनी पूर्णेतील अनेक महत्वाचे उपविभागीय रेल्वे कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित करण्याचे पाप सातत्याने चालवल्याचे काम केले आहे ह्या अशा निकृष्ट माणुसकीच्या लोकांमुळे पूर्णा येथील तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे कोणत्याही प्रकारचे काम त्यांच्या हाती नसल्यामुळे ते आज शिक्षित बेरोजगार म्हणून नावारूपाला दिसून येत आहेत. 


या तरुणांच्या भविष्याचा विचार करून आज पूर्णावासीयांच्या कडून पूर्णा शहरातील सर्व पक्ष संघटना, व्यापारी वर्ग, आणि सुजान नागरिक, एकत्र येऊन पूर्णा च्या वतीने आज बाजारपेठ व दुकाने कडकडीत बंद करण्यात आले. तसेच काही मागण्या रेल्वे प्रशासनाला या धरणे आंदोलनात करण्यात आल्या १ पूर्णा येथे प्रस्तावित इलेक्ट्रिक लोको शेड त्वरित सुरू करावे, २ प्रस्ताविक सिद्धार्थनगर ते जिल्हा परिषद माध्यमिक शाळेस जोडणारा पादचारी पूल हिंगोली येथील रेल्वे स्टेशन प्रमाणे त्वरित बांधण्यात यावे. ३ पूर्णा येथील विविध रेल्वे विभागात कार्यरत असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कार्यालयांना कोणत्याही जूजबी कारणावरून इतरत्र हलविण्यात येऊ नये. ४ पार्सल आणि तिकीट कार्यालयाचे कंत्राटीकरण करू नये व येथील कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्यात येऊ नये. ५ प्लॅटफॉर्म नं १ वर तिकिटासाठी टिकीट खिडकीची सुविधा नसल्यामुळे वृद्ध व इतर प्रवाशांची कुचंबना होत आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म नं १ वर तिकिटासाठी तिकीट खिडकीची सुविधा तात्काळ सुरू करावी. ६  प्लॅटफॉर्म नं १ ते ४ वर येणाऱ्या व जाणाऱ्या पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या निश्चित करून त्यात बदल करू नये. ७ साधारण गाड्यांना विशेष ( spacial ) नावाने उल्लेख करून तिकीट भाडे अधिक प्रमाणात वसूल केले जात आहे ही लूट त्वरित थांबून तिकिटाचे दर कमी करावेत. ८ चोऱ्या - माऱ्या व गुन्हेगारी लक्षात घेता रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस स्टॉप  ( GRP ) वाढविण्यात यावा, ९ पूर्णा रेल्वे स्थानकावरील स्वच्छता आणि येथून सुटणाऱ्या गाड्यांची साफसफाई योग्य तऱ्हेने व्हावी, या गाड्यात पाण्याची व्यवस्था सुद्धा करावी. १० पूर्णा रेल्वे विभागअंतर्गत असणारे मोडकळीस आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करावे या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व पुर्णा संघर्ष समिती व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने केले या आंदोलनात पुर्णेतील सर्व धर्मीय व सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरीकांसह सर्व समाज बांधवांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला....

✍️वृत्त संकलन/छायाचित्रे  : दिपक साळवे पुर्णा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या