💥राजकीय दृष्ट्या बेवारस ठरलेल्या परभणी जिल्ह्याला सक्षम,कार्यक्षम व पूर्ण वेळ पालक मंत्री द्या...!


💥परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी💥


परभणी (दि.०७ फेब्रुवारी) - राज्यात नवीन सरकार आल्यानंतर परभणी जिल्ह्याला मा. ना. तानाजी सावंत साहेब हे पालक मंत्री म्हणून देण्यात आले त्यांच्या नियुक्ती पासून ते फक्त एकदाच आणि ते पण दोन तासासाठी परभणी जिल्हयांच्या दौऱ्यावर आले आले होते. पालक मंत्रीपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांचे परभणी जिल्ह्याकडे अजिबातच लक्ष नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत नाहीत त्यामुळे अनेक शासकीय विकास योजना मान्यते अभावी प्रलंबित आहेत शिवाय अनेक महत्त्वपूर्ण शासकिय प्रकरणे प्रलंबीत असून परभणी जिल्ह्याला पालक मंत्री असतांनाही परभणी जिल्हा बेवारस झाला आहे.


मा. ना. तानाजी सावंत साहेब हे व्यस्त असल्याने त्यांना परभणी जिल्ह्यात यायला वेळ नाही त्यामुळे ते मुंबईत बसूनच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतात ही अत्यंत दुदैवी बाब असून मा.ना. तानाजी सावंत साहेबांवर राज्याच्या इतर अनेक महत्वाच्या जवाबदा-या मोठ्या प्रमाणावर असल्या मुळे परभणी जिल्हयाला दुसरा कोणी ही पूर्ण वेळ, कार्यक्षम व सक्षम पालक मंत्री द्यावा अशी मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडे करण्यात आली आहे. नवीन पालकमंत्री देण्याच्या मागणीचे पत्र आज मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आले आहे.

 महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असतांना परभणी जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री मा. नवाबजी मलिक साहेब हे फक्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठीच परभणी जिल्ह्यात येत होते त्या मुळे त्यांना झेंडा मंत्री असे बिरूद परभणीच्या जनतेने दिले होते. सध्याचे पालकमंत्री हे जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी जिल्ह्यात येत नाहीत शिवाय शासकीय ध्वजारोहना साठीही येत नाहीत ही परभणी जिल्हयासाठी अत्यंत दुदैवी बाब आहे, पालक मंत्र्याच्या या कार्यप्रणालीचा प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे.

मा.ना. तानाजी सावंत साहेबांवर मोठया राज्याच्या इतर अनेक महत्वाच्या जवाबदा-या मोठ्या प्रमाणावर असल्या मुळे परभणी जिल्हयाला दुसरा कोणी ही पूर्ण वेळ, कार्यक्षम व सक्षम पालक मंत्री द्यावा या बाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास प्रहार जनशक्तीच्या पक्षाच्या वतीने परभणी जिल्ह्यात प्रती पालक मंत्री कार्यालय सुरू करून जनतेचे प्रश्न सोडवले जातील असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे,शहर चिटणीस वैभव संघई, महिला आघाडी शहर चिटणीस ॲड.सुवर्णाताई देशमुख,उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, रामेश्वर पुरी, पिंटू कदम, शेख बशीर, सय्यद युनूस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या