💥रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते समाजकल्याण विभागाच्या दालनाचे उद्घाटन....!


💥यावेळी संमेलनाध्यक्ष हभप.तुकाराम महाराज गरुड तर स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांची उपस्थिती💥

परभणी (दि.१५ फेब्रुवारी) : वारकरी साहित्य परिषदेचे नुकतेच १९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या दालनाचे उद्घाटन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

            संमेलनाध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज गरुड, स्वागताध्यक्ष,आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, भरत गोगावले, वारकरी साहित्य परिषदेचे ह. भ. प. विठ्ठल पाटील, ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, सुरेश जाधव, आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे आदी उपस्थित होते.

साहित्य संमेलनानिमित्त राज्यभरातून येथे भेट देणाऱ्या नागरिकांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, या दृ्ष्टिकोनातून हे दालन उभारण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई घरकुल आवास योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, भारत सरकार शिष्यवृत्ती, तृतिय पंथीयांसाठीच्या सोयीसुविधा व दूरदृष्टीता, अनुसूचित जाती-जमातीमधील अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य, ऊसतोड कामगारांसाठीच्या योजना, स्टैंडअप योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांच्या उद्योगांना मार्जिन मनी देणे, विद्यार्थ्यासाठी शालांत पूर्व परीक्षा, शासकीय निवासी शाळा, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी आश्रमशाळा, राजर्षि शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनांसह इतर योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या