🌟मंगरूळपीर शहरात नियमबाह्य पध्दतीने चालणारी सेतु सुविधा केंद्र बंद करून कारदेशीर कारवाई करण्याची मागणी....!🌟लेखी तक्रार ऊपविभागिय अधिकारी व तहसिलदार यांना लेखी निवेदनाव्दारे तक्रारकर्त्यांनी केली🌟

फुलचंद भगत

वाशिम :-फक्त मंगरुळपीर गावाचेच परवाने व सेतु केंद्राचे काम करावयाचे असतांना ते संपुर्ण मंगरूळपीर तालुक्याचे कामे करतात तसेच तर्‍हाळा येथील महा ई सेतु केंद्र असतांनाही मंगरूळपीर तहसिलच्या आवारातच सबंधित व्यक्ती महा ई सेतु चालवत असल्याची लेखी तक्रार ऊपविभागिय अधिकारी व तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे तक्रारकर्त्यांनी केली आहे.

          मंगरुळपीर शहरात काही गैरकायदेशीररित्या सेतु चालवत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार केल्या जात आहेत.दि.२४ फेब्रुवारी येथील तहसिल कार्यालयाला दिलेल्या लेखी निवेदनानुसार तहसिल अधिकार्‍यांना हाताशी धरुन इतर सेतुवाल्यांची प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे.तहसिल परिसरात 'तहसिल सेतु केंद्र' नावाचा बोर्ड लावुन काहींनी लोकांची दिशाभुल सुरु आहे.वास्तविक सबंधितांचे महा ई सेवा केद्र आहे.एवढेच नव्हे तर अवैधरित्या तहसिल कार्यालयाच्या आवारातच सेतु लावुन कार्यालयाचे ताराचे कपांऊंड तोडुन सरकारी मालमत्तेचे नुकसान केलेले आहे.तरीही तहसिल प्रशासन चुप का?असा प्रश्न निवेदनकर्त्यांनी तक्रारीमध्ये ऊपस्थीत केला आहे.तर्‍हाळा गावचा ई सेतु परवाना असतांना तो सेतु मंगरुळपीर आवारातच सेतु सुरु असल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे.संपुर्ण तालुक्यांचे सेतुचे कामे तहसिल परिसरात सुरु असलेल्या सेतुमधुन केल्या जात असल्याने इतर गावातील सेतुवाल्यांना काम मिळत नाही परिनामी त्यांचेवर बेरोजगारीची पाळी येत असल्याचे म्हणने आहे.वरिष्ठ प्रशासनाने सबंधित सेतुवाल्याची चौकशी करून कायदेशिर कारवाई करण्याची मागणी निवेदव्दारे केली आहे.सदर निवेदनावर सतिष चिकनकर,शिवा कर्चे,शिवाजी गजभार,विजय रघुवंशी,तेजस बडवे,ऊमेश गजभार,चेतन गिरी,पवन दाते,दत्ता नागुलकर,निलेश भजने आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या