💥परभणीत जिल्हास्तरीय एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा....!


💥इच्छुक संघांनी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन💥

परभणी (दि.01 फेब्रुवारी) : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 व 17 फेब्रुवारी रोजी एफ. सी. बायर्न कप परभणी येथे 14 वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन डॉ. झाकेर हुसेन हायस्कूल, परभणी येथे करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुक संघांनी 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

            क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे व बायन क्लब, जर्मनी यांच्यात झालेल्या करारानुसार क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना म्युनिक (जर्मनी) येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय अशी राहणार असून, राज्य स्पर्धेतून एकूण 20 खेळाडूंची निवड करुन त्यांना म्युनिक येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी जाणे-येणे, तेथील निवास आणि प्रशिक्षणावर होणारा खर्च संस्थेकडून करण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील संघात सहभागी होण्यासाठी दि. 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेला खेळाडू पात्र ठरणार आहे. संघाच्या प्रवेश अर्जासोबत खेळाडूंचे आधार कार्ड, जन्मदाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र जमा करावे. प्रत्येक संघाने फुटबॉल खेळासाठी आवश्यक क्रीडा साहित्य, गणवेश व आवश्यक बाबी स्वतः सोबत आणाव्यात. या स्पर्धेसाठी शाळांनी फुटबॉल खेळाडूंचा (14 वर्षाखालील मुले) संघ उपस्थित ठेवावा. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी शैलेंद्रसिंह गौतम (9420037362)  आणि जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव मो. इकबाल (8888115377) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या