💥जिंतूर अवैध वाळू तस्करांचा धुमाकूळ : अवैध वाळू करणारा टिप्पर पोलिस पथकाने पकडला....!


💥पोलिसांच्या कारवाईत 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त : दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल💥


परभणी/जिंतूर (दि.०३ फेब्रुवारी) - परभणी जिल्ह्यात सर्वत्र अवैध गौण खनिज दगड खडी मुरुम मातीसह अवैध वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असून यात जिंतूर तालुका देखील आघाडुवर असल्याचे काल पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून निदर्शनास येत असून जिंतूर शहरातील औंढा रोडवरील औद्योगिक (एमआयडीसी) वसाहत परिसरात अवैधरीत्या चोरट्या वाळूची वाहतूक करणारा हायवा टिप्पर पोलिस पथकाने पकडला या प्रकरणात दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची घटना काल गुरुवार दि.02 फेब्रुवारी 2023 रोजी घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळाळलेली अधिक माहिती अशी की पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके हे रात्रीच्या गस्तीवर असताना आडगाव फाटा कडून जिंतूरकडे चोरटी वाहतूक करणारा हायवाट्रक येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती म्हणुन शहरातील जिंतूर औंढा रोडवरील एमआयडीसी परिसरा असलेल्या हॉटेल समोर तपासणी दरम्यान हायवाट्रक मध्ये अवैद्य वाळू साठा आढळून आला होता दरम्यान पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर राठोड व पांडुरंग घुसळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक विकास कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी चवरे हे करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या