💥जिंतूर आगरातील चालकाने बस चालकाने दिला आत्महत्येचा इशारा....!


💥महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या आत्महत्येस जबाबदार असतील असे निवेदनात म्हटले आहे💥

प्रतिनिधी जिंतूर / बि.डी. रामपूरकर

जिंतूर : आगरातील चालकाने आगारप्रमुखांना निवेदन दिले असून वेळेवर पगार न झाल्यास आत्महत्या करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. व तसे लेखी पत्र दर महिन्यात सात तारखेला पगार देण्यात यावी नसता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या आत्महत्या जबाबदार असतील असे निवेदनात म्हटले आहे. आमचा विचार न केल्यास 25 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशी तक्रार जिंतूर आगारातील चालक पंढरीनाथ घुगे यांनी केली आहे.

निवेदनाच्या प्रती आगार व्यवस्थापक जिंतूर, विभाग नियंत्रक परभणी, पोलीस स्टेशन जिंतूर, तहसील कार्यालय जिंतूर, जिल्हाधिकारी परभणी, जिल्हाअधिक्षक परभणी, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, उपमहाव्यवस्थापक मुंबई यांना दिल्याचे निवेदनात म्हटले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या