💥अखेर शहिद विर जवान सुर्यकांत नामदेवराव जोगदंड यांना ५६ वर्षाच्या प्रतिक्षे नंतर जिल्हा प्रशासनाने दिला न्याय....!


💥पुर्णा तालुक्यातील धाडसी शहिद विर जवान सुर्यकांत जोगदंड यांची शौर्य गाथा देणार भावी तरुण पिढीला प्रेरणा💥


✍🏻विर जवान शौर्यगाथा : लेखक - चौधरी दिनेश (रणजीत)

सन १९६५ च्या भारत-पाकीस्तान युध्दात शहिद झालेल्या पुर्णा तालुक्यातील गौर येथील शहिद विरजवान सुर्यकांत नामदेवराव जोगदंड यांना जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी आंचलजी गोयल व जिल्हा सैनिक कल्याण  विभागाचे सन्माननीय अधिकारी श्री.पाटील यांनी जिल्हा प्रशासनात रितसर नोंद करुन योग्य सन्मान मिळवून दिला...शहिद विर जवान सुर्यकांत जोगदंड यांच्या कुटुंबातील वारस श्री.विजय जोगदंड व शरद जोगदंड यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनपर माहितीमुळे आमच्या प्रयत्नांना यश आले सप्टेंबर १९६५ यावर्षी तत्कालीन प्रधानमंत्री स्व.लालबहाद्दूर शास्त्रीजी यांच्या कार्यकाळात भारत-पाकीस्तान या दोन देशात तब्बल २२ दिवस घनघोर युध्द झाले या भयंकर युध्दात भारत-पाकीस्तान बॉर्डर आयएएफडी क्र.९३१ या ठिकाणी युध्दात अडकलेल्या भारतीय जवानांना रसद पुरवण्यास गेलेले विर जवान सुर्यकांत नामदेवराव जोगदंड राहणार गौर जिल्ह्यात परभणी/हिंगोली संयुक्त मराठवाडा महाराष्ट या विर जवानाचा शत्रू सैन्याने केलेल्या रॉकेट हल्ल्यात होरपळून मृत्यू झाला होता या घटने नंतर शहिद विर जवान सुर्यकांत नामदेवराव जोगदंड यांचे मुळगाव गौर येथील जोगदंड कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क साधून तत्कालीन सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी त्यांना मरणोप्रांत प्राप्त निधीसह त्यांचे अन्य साहित्य देऊ केले परंतु या देशभक्त कुटुंबातील वडीलधाऱ्या जेष्ठ मंडळींनी आमचा पुत्र या देशासाठी शहिद झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान असून जेव्हा तोच गेला तर आम्ही त्याचा पैसा व अन्य साहित्य घेऊन काय करणार ? असा प्रश्न उपस्थित करुन त्याच्या विर मरणाची इतिहासात नोंद व्हावी व त्याच्यासह कुटुंबाचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली परंतु जिल्ह्यातील प्रशासनाने या देशभक्त कुटुंबातील जेष्ठांची अपेक्षा देखील तब्बल ५६ वर्षापर्यंत पुर्ण केली नाही ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल ना ? कुटुंबाला काही एक न सांगता नांदेड येथे दि.१० जुन १९६१ रोजी झालेल्या सैन्य दलाच्या भरतीत निवड झालेल्या या देशभक्त मर्द मराठा विर जवानाने तब्बल ४ वर्षापर्यंत सैन्य दलात यशस्वीपणे सेवा बजावली या कालावधीत एकही वेळ आपल्या मुळ गाव गौर येथील कुटुंबाशी संपर्क देखील साधला नाही परंतु दुर्दैवच म्हणावे लागेल की जोगदंड कुटुंबाला शेवटी १२ सप्टेंबर १९६५ रोजी आपला हा सुपुत्र देशासाठी शहिद झाल्याची खबर ऐकावयास मिळाली देशासह समाजाप्रती आपल काहीतरी कर्तव्य असल्याची प्रांजळ भावना सदैव हृदयात बाळगून सातत्याने कार्यरत राहणारे देशभक्त जोगदंड कुटुंब आपल्या कुटुंबातील सदस्याने देशासाठी विरमरण पत्करल्यानंतर देखील केवळ प्रशासनाकडून योग्य सन्मानाचीच अपेक्षा करीत आपल्या तिसऱ्या पिढीत पोहोचले परंतु त्यानंतर देखील प्रशासनाकडून सादा सन्मान तर सोडाच या कुटुंबातील प्रखर देशभक्त शहिद विर जवान सुर्यकांत नामदेवराव जोगदंड यांची जिल्हा प्रशासनात सादी नोंद देखील करण्यात आली नाही अशी खंत व्यक्त करीत असतांना सन १९९७/९८ यावर्षी कुटुंबातील त्यांचे वारस विजय जोगदंड यांनी एक पत्रकार मित्र या नात्याने माझ्याशी संपर्क साधून या घटने संदर्भात सविस्तर माहिती दिली त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही त्यावेळी एका अंतरदेशी पत्रावर संपूर्ण मजकूर लिहून सैन्य दलाच्या तत्कालीन सन्माननीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला यावेळी थल सेना अध्यक्ष जनरल वेद मलिक हे होते त्यांनी तात्काळ दखल घेऊन शहिद जवान सुर्यकांत जोगदंड यांचा मरणोप्रांत दि.१७ सप्टेंबर १९९९ रोजी कारगील विजयी दिनाचे औचित्य साधून शहिद विरजवान सुर्यकांत जोगदंड यांच्या कुटुंबातील विजय जोगदंड यांना औरंगाबाद येथे बोलवून विरजवान सुर्यकांत जोगदंड यांच्या नावाने सन्मानपत्र व पदक देऊन सन्मानीत केले परंतु यानंतर या शहिद विर जवानासह त्यांच्या कुटुंबाचा जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी सन्मान व्हावा याकरिता त्यांच्या नावाची जिल्हा प्रशासनासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात रितसर नोंद व्हावी याकरिता जोगदंड कुटुबांतील सदस्य विजय जोगदंड व शरद जोगदंड यांनी माझ्याशी सातत्याने संपर्क साधून लढा कायम ठेवत लेखी स्वरुपात जिल्हा प्रशासनासह सैन्य दलाकडे विनंत्या केल्या यासह वेळोवेळी वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात वृत्त देखील प्रकाशित केले त्यांच्या शहिद जवान सुर्यकांतराव जोगदंड यांच्या विषयी नितांत आदर व्यक्त करीत दैनिक सकाळ,दैनिक आधुनिक केसरी,दैनिक प्रसार,दैनिक सत्यलेख,दैनिक एकमत,मासिक अजितपत्र हिंदी पाक्षिक प्रजातंत्र शक्ती,जंग-ए-अजितन्युज वेब वृत्त वाहिनीसह अनेक वृत्तपत्रांनी वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले अश्या प्रकारे तब्बल ३३ वर्षाच्या लढ्यानंतर विद्यमान सन्माननीय जिल्हाधिकारी आंचलजी गोयल व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सन्माननीय एस.एस.पाटील यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शहिद विर जवान सुर्यकात जोगदंड यांच्या संदर्भातील माहिती मागवली असता एसआरओ श्री.एम.डी.कमीरकर यांनी दि.२७ एप्रिल २०२२ रोजी परभणी जिल्हा प्रशासनाला लेखी स्वरुपात केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केले की सदरील शहिद विर जवाना संबंधिचे सर्व रिकॉर्ड सन १९९५ यावर्षी नष्ट करण्यात आल्यामुळे सैन्यदलाकडे त्यांच्या सैन्य दलातील नियुक्तीसह विरमरणाची तारीख घटनास्थळ व विर मरण (मृत्यूच्या) तारखे व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याचे कळवले या अल्पशः माहितीच्या आधारे सन्माननीय जिल्हाधिकारी आंचलजी गोयल व सन्माननीय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस.एस.पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात रितसर नोंद करुन या शहिद विरजवानासह त्यांच्या कुटुंबाला तब्बल ५६ वर्षांनी न्याय मिळवून दिल्यामुळे त्यांच्या विषयी संपूर्ण पुर्णा तालुक्यात आदर व्यक्त होत असून त्यांनी केलेल्या या महत्वपुर्ण नोंदीमुळे शहिद विर जवान स्व.सुर्यकांत नामदेवराव जोगदंड यांच्या भव्य शहिद स्मारकाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.

कारण जिल्हा सैनिक कल्याण विभागा मध्ये या शहिद जवानाची २०२२ पर्यंत नोंद नव्हती शहिद उधमसिंघ फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलेल्या विनंतीस मान देऊन त्यांचे जन्मगाव असलेल्या गौर ग्राम पंचायतीने दि.२५ फेब्रुवारी २०१९ रोजी ग्राम पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सरपंच सौ.चांगुणाबाई अनंतराव पारवे यांनी ठराव क्र.०६ अंतर्गत बहुमताने ठराव पास करून शहिद विरजवान सुर्यकांत जोगदंड यांच्या स्मारकासाठी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील जागा देण्याचा अत्यंत महत्वपुर्ण ठराव पास केला होता या जागेवर आता लवकरच सन्माननीय जिल्हाधिकारी आंचलजी गोयल व सन्माननीय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.पाटील साहेब यांच्या मार्गदर्शना प्रमाणे शहिद विरजवान सुर्यकांत जोगदंड यांचे शहिद स्मारक निर्माण होणार आहे..... 


✍🏻विर जवान शौर्यगाथा : लेखक - चौधरी दिनेश (रणजीत)

संस्थापक अध्यक्ष : शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र 

मो.क्र.9766529055

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या