🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स/ बातम्या....!


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुख्य कार्यालय ठाण्यामध्ये 🌟       

✍️मोहन चौकेकर                        

* लवकरच हळूहळू सर्व गोष्टी बाहेर आणनार,पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांचे सुचक वक्तव्य,उद्धव ठाकरे यांच्या पायाखालीची वाळु सरकलीय मी बोललो तर अनेकांची अडचण होईल -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती पण मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस नको होते-- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुख्य कार्यालय ठाण्यामध्ये 

* अयोध्येत बांधले जाणार 101 फूट उंचीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भव्य मंदिर ; 24 फेब्रुवारीला भूमिपूजन

* काँग्रेस नेते पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; खेरा यांना मंगळवारपर्यंत अटकेपासून संरक्षण

* महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयतील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला

* श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे ICC महिला T20 विश्वचषक 2023 मधून पूजा वस्त्राकर बाहेर, तिच्या जागी स्नेह राणाची वर्णी

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय:विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

* हसन मुश्रीफ यांची केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदावरून हकलपट्टी करावी - किरीट सोमय्या

* जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा मिशन मोडवर राबवला जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

* 12 वीच्या उत्तरपत्रिका तपासणीत अडचणी येण्याची शक्यता:जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नियामकांच्या बैठकीवर बहिष्कार

* कश्मिर टू कन्याकुमारी रेस अक्रॉस इंडिया स्पर्धा:औरंगाबादचे 4 सायकलिस्ट होणार सहभागी, 3651 किलोमीटरची शर्यत

* संगीत नाटक अकादमी पुरस्काराने अभिनेते प्रशांत दामले सन्मानित, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

* काँग्रेस नेते पवन खेरा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा: अंतरिम जामीन मंजूर करत सुटकेचे निर्देश, दिल्ली विमानतळावरून झाली होती अटक

* महाराष्ट्रासह 8 राज्यांत NIA चे छापे, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांच्यासाठी काम करणाऱ्या 6 आरोपींना अटक

* दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या पीएला ईडीचे समन्स ; ईडीकडून कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याबाबत चौकशी होणार

* शेअर मार्केटमध्ये घसरण: सेन्सेक्स 139 अंकांच्या घसरणीसह 59,605.80 वर बंद, निफ्टी 43 अंकांच्या घसरणीसह 17,511.25 वर बंद

* गोव्याला फिरायला जाणाऱ्यांसाठी खुशखबर, रेल्वे प्रशासनाकडून नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या 2 जुलैपर्यंत चालविण्यात येणार

* पुण्यातील 7 मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडून हकालपट्टी, पक्षात राहून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप

* पालघरच्या सहा महिला चित्रकारांनी सहा तासात साकारले जगातील सर्वात मोठे चित्र, 120 महिलांच्या मदतीने साकारले जगातले सर्वात मोठे वारली चित्र

* सोन्याच्या दर स्थिर: मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅम 56510 रुपयांना तर 22 कॅरेट सोन्याचे दर 51800 रुपये प्रति 10 ग्रॅम

* ओरिएंट सिमेंटने अदानी पॉवर महाराष्ट्र सोबतचा करार केला रद्द, अदानी समूह या करारासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यास अपयशी

* अरुणाचल प्रदेशमध्ये पहाटे 2.25 वाजता भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.1 इतकी, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती

* मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत पहिल्या टप्प्यात 238 लाभार्थ्यांना छोट्या व्यवसायांसाठी प्रत्येकी 3 लाख 20 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर; लाभार्थ्यांना मंजुरी पत्र निर्गमित

* आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढले ; देशांतर्गत कापसाचे भाव वाढण्याची शक्यता, भाव 9,500 पर्यंत जाण्याची शक्यता

* भारतीय संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवला पितृशोक, आजारी आल्याने तिलक यादव यांनी वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

* जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या ‘मिशन मोड‘ वर राबवाव्यात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महसूल प्रशासनाला सूचना

* फ्लिपकार्टने पगारवाढ रोखण्याचा घेतला निर्णय, कंपनीतल्या 30 टक्के वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह जवळपास 4500 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार

* गुजरात: मोरबी पुल प्रकरणी प्रत्येकी 10 लाख भरपाई देण्याचे गुजरात उच्च न्यायालयाचे आदेश; मागील वर्षी या दुर्घटनेत पुल तुटल्याने 135 जणांचा झाला होता दुर्दैवी मृत्यू....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या