💥निवडणूक आयोगाकडून शिवसेना नावासह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्याबद्दल पुर्णा शहरात दिवाळी साजरी....!


💥राज्यात हिंदुहृदय सम्राटांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा राज्यात एकच...नाथ...फट्यांक्यांची आतिषबाजी मिठाईचेही वाटप💥


पूर्णा (दि.१८ फेब्रुवारी) -  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह बहाल केल्याबद्दल निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचे जल्लोशात स्वागत करत काल शुक्रवार दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्णा शहरात शिवसेना (शिंदे) गटाच्या पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख माधवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,महामानव भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी शहरातील शिवतिर्थ परिसरात शिवसेना पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत अक्षरशः दिवाळी साजरी केली यावेळी पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे देऊन जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख माधव कदम उपजिल्हाप्रमुख एकनाथराव लोखंडे, विधानसभा प्रमुख चंद्रकांत पाटील सुर्यवंशी, तालुकाप्रमुख प्रकाशराव कऱ्हाळे,शहरप्रमुख ॲड. किरडे, तालुका सचिव सुनील इंगोले, युवासेना तालुकाप्रमुख विलास गिरी,युवासेना शहरप्रमुख अंकित कदम,महिला सेना तालुकाप्रमुख संगीताबाई पुरी,मुस्लिम सेना शहरप्रमुख मुजमीलखाँ उर्फ पाशा चाँदखाँ,दलित सेना शहरप्रमुख भिमराव आवटे,तालुकासंघटक नरहरी कदम,उपशहर प्रमुख लक्ष्मण कदम, गजानन कदम,शहर संघटक दत्ता कदम,युवासेना शहरसंघटक विशाल कदम,उत्तमराव ढोणेपांगरा सरपंच,गोविंदराव ढोणे,बाबुराव जोगदंड, रंगनाथ जोगदंड,दासराव देसाई,नागुराव शिंदे,गणपतराव सुर्यवंशी,बळीराम गुंडाळे,सखाराम खंडागळे, कालिदास गुंडाळे,मदन भोसले,राजू लोखंडे,हरी पाटील सुर्यवंशी,लखन बुचाले,गोविंद दाढे, किशन देसाई,तुळशीराम खैरे,बाळू नादरे,पंकज नादरे,डिगंबर खैरे,बालाजी खंडागळे,आदिनाथ गुंडाळे,करण कराळे तसेच तालुक्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या