💥पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्नालय बनले शहरातील रुग्नांसाठी निव्वळ शोभेची वास्तू...!


💥गोरगरीब रुग्नांसाठी शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत रुग्नालयाची निर्मिती आवश्यक💥


✍🏻 परखड सत्य : चौधरी दिनेश (रणजीत)

पुर्णा (दि.१७ फेब्रुवारी) - पुर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरापासून तब्बल जवळपास तिन ते सव्वातील किलोमीटर असल्यामुळे सदरील शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरातील गोर गोरीब रुग्नांसाठी केवळ शोभेचे वास्तू झाल्याचे निदर्शनास येत असून शहरातील गोरगरीब/शेतमजूर/रोजमजूर हातगाड्यांवर छोटे/मोठे व्यवसाय करुन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांना शहरातून शहराबाहेर पुर्णा-ताडकळस राज्य महामार्गावर असलेल्या शासकीय ग्रामीण रुग्नालयापर्यंत विलाजासाठी/प्रसुतीसाठी (डिलेव्हरीसाठी) जाण्यासाठी दोन/तिनशें रुपयें खर्चावे लागतात एवढे करुन जरी शासकीय ग्रामीण रुग्नालयात पोहोचल्यानंतर या रुग्नालयात औषधांचा तुटवडा/विविध शारीरिक तपासण्यांची यंत्रांअभावी सुविधा नाही तज्ञ डॉक्टरांची सातत्याने अनुपस्थिती रुग्नांशी त्यामुळे शहरातील गोर गरीब सर्वसामान्य रुग्नांना नाईलाजास्तव ऐपत नसतांना देखील खाजगी सावकारांच्या सावकारशाहीला बळी जाऊन खाजगी रुग्नालयात उपचारासाठी जावे लागते.


पुर्णा शहरात मागील २०२१/२२ वर्षी डेंग्यू सदृष्य तापेची साथ फैलावल्यानंतर असंख्य गोर गरीब कुटुंबांना अक्षरशः विलाजासाठी खाजगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा टक्केवारीने पैसे घेऊन आपल्या कुटुंबातील बिमार सदस्यांचे विलाज करावे लागले शहरातील खाजगु रुग्नालयांमध्ये अक्षरशः जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते अश्या भयंकर परिस्थितीत अनेक सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे लेखी स्वरुपात निवेदन देऊन शहरात शासकीय प्राथमिक उपचार केंद्राची सुरूवात करण्याची मागणी केली परंतु निद्रीस्त प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले यावेळी अनेक गोरगरीब कुटुंबातील सदस्यांना योग्य उपचाराअभावी आपले प्राण देखील गमवावे लागले यावेळी खाजगी रुग्नालय चालकांकडून गोरगरीब सर्वसामान्य रुग्नांची अक्षरशः आर्थिक पिळवणूक देखील झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला.

शहरातील मस्तानपुरा,नई आबादी,अजिज नगर,अली नगर,अण्णाभाऊ साठे नगर,भिमवाडा,कोळीगल्ली,कुंभार गल्ली,धनगरवाडा,डोबी गल्ली,पुर्णा/थुना नदीकाठावरील वसाहतीसह अनेक भागात मागील वर्षी डेंग्यू सदृष्य तापीसह,मलेरीया,काविळ,आदींसह विविध साथीच्या आजारांनी अक्षरशः थैमान घातले होते या भागात राहणाऱ्या रोजमजूर/रोजमजूर गोरगरीब जनसामान्यांना उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्नालयाशिवाय पर्यायच नव्हता परंतु शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरापासून जवळपास तिन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नययें याकरिता जिल्हा प्रशासन/जिल्हा आरोग्य प्रशासनाने पुर्णा शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत शासकीय दवाखाना सुरु करावा अशी अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या