💥पुर्णा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया शाखाने केला राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध....!


💥राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले निवेदन💥


पुर्णा (दि.१३ फेब्रुवारी) - राज्यात सर्वत्र पत्रकारांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून दिवसेंदिवस पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना घडत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची समाजकंठकांनी रिफायनरी विरोधात बातम्या लावल्याच्या द्वेषातून महिद्रा थार गाडीखाली चिरडून त्यांची निर्घृण हत्या केल्या मुळे राज्यातील पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी पुर्णा तालुका व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अनंद ढोणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पत्रकार नारायण सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पत्रकारांनी एकत्रित येवून तहसिलदार टेमकर व नायब तहसिलदार कोकाटे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून या अमानवीय कृत्याचा निषेध केला.

व्हाईस ऑफ मिडिया पूर्णा तालुका शाखाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले की रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांची रिफायनरी प्रकल्पाचे समर्थक पांढरीनाथ आंबेरकर यांनी स्वत:ची चार चाकी महिंद्रा गाड़ी अंगावर घालून धडक देत हत्या केली होती, त्या पांढरी आंबेरकर व इतर साथीदार आरोपी विस्द्ध पत्रकार सरक्षण कायदया अंतर्गत फास्टट्रॅक जलदगती न्यायालयात प्रकरण चालऊन कड़क शासन व्हावे तसेच हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली ह्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया तालूकाअध्यक्ष आनंद ढोणे पाटील, उपाध्यक्ष गजानन नाईकवाडे, नारायण सोनटक्के सुशील गायकवाड, शिवबाबा शिंदे, ज्ञानदेव बाबडे, संजय पांचाळ, तुकाराम ढोणे ,जंनार्धन आवरगंड, नवनाथ पारवे आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या