💥जिंतूर शहरातीला प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना लिपीकाकडून पैशाची मागणी....!


💥प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्याने केली मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर नगरपालिका हद्देतील ईदगाह परिसर येथील रहिवासी शेख मेहबूब शेख उमर यांच्या नावे प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत घरकुल मिळाले असता त्यांना आजपर्यंत टप्प्याटप्प्याने तीन हप्ते पैसे मिळाले परंतु सदर चौथा हप्ता मिळाला नाही या संदर्भात त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी नगरपालिकेतिल घरकुल विभाग येथे चौकशी केली असता या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी चौथा टप्पा पैसे टाकण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप शेख मेहबूब यांनी केला आहे. जिंतूर नगरपरिषद येथील घरकुल विभागातील कर्मचारी अनुदान वाटप करण्यासाठी  पैशाची मागणी करत असल्यांचा आरोपही त्यांनी मुख्याधिकाऱ्यानां दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नगरपालिका मुख्यअधिकारी याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

          "लोकांकडून कर्जाने पैसे घेऊन घराची पूर्तता केली पण नगरपरिषद जिंतूर इथून चौथा हप्ताचे पैसे न भेटल्याने मि कर्जबाजारी झालो असून आज माझ्यावर उपासमारीची वेळ आली असल्यांचे निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या