☀️प्रसंगावधान....अन् नरहरीच्या तत्परतेमुळे मिळाले बंटीला जिवदान...!

☀️एका आईच्या मुलाला तु वाईट दिवस पाहू दिला नाहीस मी तुझं अभिनंदन करते - बंटीची आई

✍️लेखक : प्रकाशराव जोशी (कर्तृत्ववान नरहरीचे वडील)

माझा मुलगा नरहरी प्रकाशराव जोशी हा कालादि.२७ जानेवारी रोजी नांदेड येथे येथे महात्मा फुले मा.व उच्च मा.आश्रम शाळेत (वाघाळा - नांदेड) येथे BEd चे  टाचन तपासून घेण्यासाठी व शाळेत पाठ घेण्यासाठी गेला होता..शाळेत थोडा वेळ थांबावे लागेल असा निरोप मिळाल्याने एवढ्या वेळात तो काळेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेला.सुरुवातीला गंगामातेचे दर्शन घ्यावे म्हणून नदीपाञाकडे गेला.

खाली गर्दी जमली होती.तीन मिञ सेल्फी काढण्याचा नादात पॉलीटेक्नीकला असलेला विद्यार्थी बंटी (धनेगाव-नांदेड) हा गुटांगळ्या खात होता.सगळे पहात होते.नरहरीच्या हे लक्षात आल्यावर प्रसंगावधान साधत त्याने संपूर्ण अंगावरील कपड्यासह अथांग पाण्यात उडी घेउन त्या बंटीला वाचविण्यात यश मिळवले. सर्वांनी त्या ठिकाणी त्याचे कौतुक केले.पण शाळेतील पाठ त्यादिवशी बुडाला होता.मी दिवसभर संपर्कही केला नाही.राञी ९ वाजता आईला फोन करुन ही घटना त्याने सांगितली .आईला खूप आनंद झाला.एका आईच्या मुलाला तु वाईट दिवस पाहू दिला नाहीस मी तुझं अभिनंदन करते.थांब ,पप्पाला बोल म्हणून माझ्याकडे फोन दिला.मी दोघांचे संभाषण ऐकत होतो.माझी छाती भरुन आली.पाठ आज नाही उद्या होतील.एखाद्याचा माझ्या मुलाने जीव वाचवला याचा आनंद झाला.

महात्मा फुले शाळेतील माझा मिञ व शिक्षक म्हणून कार्यत असलेला रमेश भत्ते यास सकाळी या कारणाने मुलगा येउ शकला नाही असे सांगितल्यावर मुलाला शाळेत पाठव त्याचा आम्ही सत्कार करु असा निरोप दिला.नरहरी हे बोलणे माहीत नव्हते.त्याला सकाळी फोन करुन मी निरोप दिला की,तुला प्रार्थने आगोदर शाळेत हजर राहण्यास सांगितले आहे.

शाळेतील प्राचार्य बी.बी.इंगेवाड,सहशिक्षक सर्वश्री आर.एस.चव्हाण ,रमेश भते(पर्यवेक्षक),ए.एस.भालके,एम.एम.कांबळे,डी.एस.वानोळे,एस.व्ही.पवार,डी.एस.वानोळे,व्ही.एम.चिद्रावार,ए.आर.वट्टमवार,टी.के.बनसोडे,बी.एस.पवार यांनी यांनी विद्यार्थ्यांपुढे त्याचा सत्कार करुन कौतुक केले.

आपल्या भावना व्यक्त करताना प्रशाळेतील शिक्षक म्हणाले की, तु केलेले कार्य हाच तुझा आदर्श पाठ होय.यावेळी शेकडो विद्यार्थांनी त्याचा अॕटोग्राफी घेतली.नरहरीने घडलेला प्रसंग शेकडो विद्यार्थी व शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांना सांगितला.यावेळी प्रत्येकाच्या अंगावर शहारे उभा टाकले.

नरहरी हा सगरोळी येथील श्री छञपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर काॕलेजचा माजी विद्यार्थी असून राष्रीय छाञ सेनेचा विद्यार्थी आहे. येथील स्विमींगमध्ये पोहण्याचे धडे घेतले आहेत.येथील स्थानिक पोहण्याच्या स्पर्धेत यश मिळवले आहे.

घरी आल्यावर त्याच्या आईने कौतुकाची शबासकी दिली.

सध्या जिजाउ अध्यापक महाविद्यालय (बी.एड्.) बाचोटी ता.कंधार येथे दुस-या वर्षाचे शिक्षण घेत आहे.त्याच्या या धाडसी शौर्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या