💥वाशिम पोलीस दलातील अंगुलीमुद्रा विभागात AMBIS व MESA प्रणाली कार्यरत....!


💥बोटांच्या ठश्यांच्या सहायाने ठेवला जातो आरोपींचा लेखा-जोखा💥

(फुलचंद भगत)

वाशिम :- पोलीस दलातील अंगुलीमुद्रा विभागात AMBIS (Automated Multimodal Biometric Identification System) अंतर्गत MESA (Maharashtra Enrolment System Application) या अद्ययावत प्रणाली कार्यरत असून AMBIS हि अत्याधुनिक प्रणाली C.I.D. महाराष्ट्र व CYBER महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आली आहे.


     AMBIS या प्रणालीमध्ये पोलीस स्टेशन स्तरावर अटक होणारे आरोपी, संशयित इसम, फरार इसम इत्यादींची माहिती फिंगरप्रिंट, पामप्रिंट च्या स्वरूपात डिजिटली साठवली जाते. यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला MESA उपकरणे वाटप करण्यात आले आहेत. त्यामध्ये मॉर्फोटॉप, आयरीस स्कॅनर, HD कॅमेरा, फ्लॅटबेड स्कॅनर व प्रिंटर असे साहित्य पुरविण्यात आले आहे. सदर प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे स्वतंत्र अत्याधुनिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून जिल्हाभरातील MESA अंतर्गत १३ पोलीस स्टेशन व सायबर सेल अश्या १४ ठिकाणावरील माहिती हि जिल्हास्तरावरील सर्व्हरमध्ये साठविली जाते. वाशिम घटकातील पो.स्टे.वाशिम शहर अंतर्गत २०, पो.स्टे.वाशिम ग्रामीण अंतर्गत २६, पो.स्टे.रिसोड अंतर्गत २०, पो.स्टे.शिरपूर अंतर्गत ०५, पो.स्टे.मालेगाव अंतर्गत १२, पो.स्टे.मंगरूळपीर अंतर्गत ०५, पो.स्टे.जऊळका अंतर्गत ०८, पो.स्टे.आसेगाव अंतर्गत ०४, पो.स्टे.अनसिंग अंतर्गत ०२, पो.स्टे.कारंजा शहर अंतर्गत २७, पो.स्टे.कारंजा ग्रामीण अंतर्गत ०५, पो.स्टे.मानोरा अंतर्गत २१ तर पो.स्टे.धनज अंतर्गत ०८ असा एकूण १६३ प्रकरणांचा फिंगरप्रिंट डेटा ऑनलाईन सर्व्हरमध्ये भरण्यात आला आहे.

     AMBIS प्रणालीमुळे गुन्हे उघड करण्यास व आरोपींची ओळख पटविण्यास मोलाची मदत होते. जर एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये घटनास्थळी आरोपीचे बोटांचे ठसे, चान्सप्रिंट आढळून आल्यास ते चान्सप्रिंट राज्याच्या मुख्य सर्व्हरवर शोधले असता जर त्यामध्ये साम्य आढळून आले तर सदर गुन्ह्यातील आरोपीची ओळख पटण्यास मदत होऊन ठोस पुरावा उपलब्ध होतो.घटनास्थळी सापडलेले ठसे पूर्ण जिल्हाभरातील तसेच C.I.D. सर्व्हरमधील राज्याच्या डेटाबेससोबत संगणकाद्वारे मॅच केले जातात. यामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये रेकॉर्डवरील आरोपींची बोटांच्या ठश्यांद्वारे ओळख पटविली जाते. सन २०२२ मध्ये पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम केकतउमरा येथील खुनाच्या घटनेत आरोपीच्या पायांच्या ठश्यावरून सदर प्रकरणातील आरोपीची ओळख पटविण्यात यश आले होते.

     अंगुलीमुद्रा विभागात मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.रोहिणी रिंढे, कनिष्ठ तज्ञ, अंगुलीमुद्रा, सफौ.विजयकुमार चव्हाण, पोहवा.संदिप सरोदे, पोहवा.महेश आकरे, पोहवा.संजय अंभोरे, नापोकॉ.गजानन गोटे व पोकॉ.अविनाश इंगोले हे पोलीस अधिकारी व अंमलदार कर्तव्य बजावत आहेत.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या