💥मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शहीद पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना 21 हजारांची मदत जाहीर......!


💥परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली घोषणा💥

✍️ मोहन चौकेकर 

मुंबई : चळवळीत काम करणाऱ्या आणि जनहितासाठी सर्वस्वाचं बलिदान देणाऱ्या दिवंगत शहीद पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने ‘फुल नाही फुलाची पाकळी’या न्यायानं २१ हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे. 

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारच गेला आहे. अशा परिस्थितीत पत्रकार संघटना म्हणून कुटुंबीयांच्या पाठिशी उभे राहणे परिषदेला आपले कर्तव्य वाटते. त्यामुळेच मराठी पत्रकार परिषदेने २१,००० रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी लवकरच राजापूुरला जाऊन वारिशे कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यावेळी ही रक्कम त्यांच्या कुटुंबाला दिली जाणार असल्याचे मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या